विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 8
कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’
1980 साली गुलबर्गा आणि बिदर जिल्ह्यातील अनेक गावात भानामतीचे प्रकार वरचेवर घडू लागल्यामुळे व या प्रकरणांचा वृत्तपत्रात फार गवगवा झाल्यामुळे त्याचे पडसाद कर्नाटक विधान परिषदेतही उमटले. आणि काही सदस्यांनी लक्षवेधी सुचना मांडून सरकारला या प्रकारांची अधिक चौकशी करण्याचा आग्रह केला गेला. तदनुसार विधान परिषदेचे सदस्य व बंगलोर युनिवर्सिटीचे भूतपुर्व व्हाईस चान्सलर डॉ. एच. नरसिंहय्या (जे भानामती, चमत्कार, ज्योतिष इ. खोटे मानणारे बुद्धिवादी म्हणून ख्यातनाम आहेत.) त्यांच्या नेतृत्वाखाली सात विधानपरिषद सदस्यांची या भनामतीच्या शास्त्रीय शोधासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने ‘नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरोसायन्यसेस’ (NIMHANS)या बेंगलोर येथील विज्ञान संस्थेतील सहा लेक्चरर्स, व पोस्ट गॅज्युएट व रेसिडेंट्स लोकांचे ही सहाय्य घेतले. गुलबर्गा, बीदर जिल्ह्यातील संबंधित बारा गावांना या सर्व मंडळींनी प्रत्यक्ष भेट दिली व दोनशेहून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या. परस्तूर या खेड्यातील सदतीस व्यक्तींच्या शऱीर व मानसशास्त्रीय तपासण्या केल्या आणि 1981 सालच्या प्रारंभी हे इतिवृत्त तयार करून प्रसिद्ध केले.
समितीचा निष्कर्ष
या भानामतीचा अभ्यास करून समितीने जो निष्कर्ष काढला आहे, तो समितीच्याच शब्दात पहा –
“या भानामतीचे बळी बनलेल्या बऱ्याच लोकांची सखोल तपासणी केल्यावर व भानामतीच्य़ा उपलब्ध घटनांची काळजीपुर्वक सखोल छाननी केल्यावर या शोध समितीने असा एकमुखी व ठाम निर्णय काढला आहे, की ही तथाकथित भानामती कोणत्याही अज्ञात शक्तीने घडून येत नाही.” ( हा निश्कर्ष समितीने अधोरेखित केला आहे.)
(त्या प्रकरणातील काही मथळे)
समितीची शास्त्रीय जबाबदारी
- अशा रितीने ही भानामती कुठल्याही अज्ञात शक्तिने घडून येत नसेल तर कोणत्या ज्ञात शक्तिने घडून येत होती, हे सांगण्याची शास्त्रीय जबाबदारी समितीवर येऊन पडते. ती जबाबदारी समितीने व्यवस्थित पार पाडली आहे काय असा प्रश्न आहे. ... पण खेदची गोट अशी, की या समितीने या घटनांची केवळ सारवासारव केली आहे ... आणि आवश्यक शास्त्रीय तपासणीसारख्या गोष्टींचा नावालाही उल्लेख नाही .... त्याचे सार समितीच्याच शब्दात असे – “Some of the prominent causes (of Banamati) have been fear, ignorance, superstition, personal and family problems, religious feuds and village politics.” (“या भानामतींच्या कारणांपैकी प्रमुख कारणे म्हणजे भीती, अज्ञान, अंधश्रद्धा, वैयक्तिक आणि कौटुंबिय समस्या, गरिबी, धार्मिक वैमनस्य आणि गावचे राजकारण”)
- याला म्हणतात भानामतीचा शास्त्रीय शोध!
- मनोव्याधींचा व भानामतीचा निश्चित संबंध काय?
- समिताची भानामतीचा शास्त्रीय कारणमिमांसा
- कपडे कसे जळाले?
- “भानामतीला बळी पडलेली गावे एक जात भ्रमिष्ट!” – इति समिती
- सुशिक्षित लोक सुद्धा भानामतीवर विश्वास का ठेवतात?
- शेवटी समितीचा फुगा फुटला !
- भानामतीचे प्रकार बंद करण्यासाठी शेवटी समितीने भानामती किंवा चेटूक करणाऱ्यांवर बंदी घालावी अशी सरकारला शिफारस केली आहे. पण नग्न साधूंच्या समाजात कपड्यांवर व शिंप्यांवर बंदी घालावी असे म्हणण्यासारखे हे हास्यास्पद नाही काय? जे मुळातच खोटे आहे, अस्तित्वातच नाही त्यावर बंदी कसली घालता?
- भानामतीवर कायद्याने बंदी घालायची शिफारस करून भानामती खोटी नाही हेच समितीने अप्रत्यक्षपणे मान्य केलेले नाही काय?
- फुटलेल्या फुग्याच्या शेवटी चिंध्या –
- ब्रिटिश पार्लमेंटने 1735 साली Witchcraft Act(चेटूक कायदा) पास केला होता. तो चेटूक खरोखरच करण्यात येत असल्यामुळेच, म्हणजे त्यात तथ्यांश असल्यामुळेच पास केला होता.
No comments:
Post a Comment