Sunday, 11 March 2012

‘भानामती’ नावाचे काही घडत नसते, ती कशी नाही वा असू शकत नाही असे श्री. गुली नामक व्यक्तीचे मत

उदय व अन्य मित्र हो
( मायबोली, मिसळपाव, मी मराठी नामक संस्थळावर प्रा. गळतगे यांच्या वि आणि अंनि मधील भूमिका या धाग्यावर चर्चा रंगली आहे. त्यातील काही लोकांनी भानामती वगैरे काही नसते असा विचार मांडला आहे त्यासंदर्भात तील हे लेखन )
टीओआय मधील लिंक वाचली. बातमी नेहमी कमी शब्दात व संपादून छापलेली असते. असे माझे मत आहे.म्हणून ती खोटी असे मी म्हणत नाही पण त्यातील सर्व विधाने सरसकट घेऊ नयेत असे मला वाटते.असो.
खालील एक ऑल अबाऊट बानामती - डेक्कन हेरॉल्ड मधील रिपोर्टची लिंक पुर्वी वाचनात आलीहोती.
त्यातील खालील उतारा ‘भानामती’ नावाचे काही घडत नसते, ती कशी नाही वा असू शकत नाही असे श्री. गुली नामक व्यक्तीने कर्नाटक सरकारच्या भानामतीच्या शास्त्रीय शोधाबद्दलच्या समितीतील एक सहकारी म्हणून शिवम्मा व अन्य लोकांची शारीरिक तपासणी करून सिद्ध केलेले आहे. म्हणून त्याला प्रत्यावाद नसावा.
त्यात ते म्हणतात,
“Towards this, Shivamma had called the girl to her house on April 15, and had applied chemicals on her body, and dress. This was probably some pyrogalic compound like lithium, which catches fire as soon as it comes in contact with water, Mr Guli said. Shivamma claimed before the villagers that this was through her powers of bhanamati. The girl’s elder sister, who is married, also caught fire in the same fashion a few days later, but she survived, he adds.
The examination of the dresses worn by both the victims showed traces of the chemicals used, he said. Moreover, Mr Guli points out that bhanamati cannot be practiced by a single person, as the main practitioner may claim. This has to be done by a group of people. While the main practitioner claims that he will do bhanamati on some person, his accomplices do all the physical work of applying chemicals to the victims as the case may be. They make a targeted cow drink certain chemicals which causes internal ruptures because of which it begins to yield blood instead of milk.”
ते म्हणतात, ‘probably’ (नक्की काय ते त्यांना माहित नाही पण) भानामती असल्याचे भासवणारे लोक ती 'काही काही रसायनांचा' वेळोवेळी उपयोग करून व काही लोकांना हाताशी धरून अशी परिस्थिती तयार करतात की त्यामुळे भानामती झाल्याचा आभास निर्माण होतो. हे स्पष्टीकरण ‘सत्य व नक्की पडताळा करून ठरवलेले आहे’ असे मानावे असा विज्ञानवाद्यांचा आग्रह असणार नव्हे असतो. असे हातचलाखीचे वा रसायनिक पदार्थांचे वापर करून जादुई प्रयोग करणारे अनेक आहेत.
आता वरील कथनावर वाचकाने असा विचार करावा - मीच शिवम्मा आहे. कर्नाटकातील एका खेड्यात राहाते -तो. मला एकावर मुलीवर-बाईवर आणि काही गाईंवर भानामतीचा प्रयोग करायला एकाने वैयक्तिक वितुष्टामुळे पैसे देऊन तयार केले आहे.
आता मला श्री. गुली म्हणतात तसे 'पायरोगॅलिक मिश्रणासारखे लिथियम' नावाचे रसायन अचानक आग लावायसाठी मिळवायला हवे. लिथियमला सामान्य कानडीभाषेत काय म्हणतात, ते मला घरगुती तयार करता येत नसेल तर कुठल्या किराण्याच्या वा केमिस्टच्या दुकानात मिळते, केवढ्याला व किती प्रमाणात याचा विचार करायला हवा. समजा पैशाची, रसायनाची तयारी मी केली. आता मला ते हव्या त्या व्यक्तिच्या शरीराला लावायला मिळण्यासाठी योग्य संधी हवी. ती मुलगी जी नंतर मेली, आपणहून हे सर्व करायच्या आधी शिवम्माकडे का व कशी गेली. नंतर आग लागेपर्यंत घरच्यांना काही कशी बोलली नाही. बर ती गेली तर गेली, तिची विवाहित बहिण ही नंतर काही दिवसांनी शिवाम्माकडे गुपचुप गेली पण कर्मधर्मसंयोगाने ती आगीतून वाचली...असो.
जे लोक अशी कामे हातात घेतात त्यांचे आधीच्या केसेस हाताळून पैशाने खिसे भरलेले असले पाहिजेत. आता श्री गुली म्हणतात की सत्यसोधक समितीला उत्तरे देतानाशिवम्मा सर्व गावकऱ्यांसमक्ष, मी एकटीच भानामतीच्या शक्तीने हे साध्य करते असे जरी म्हणाली असली तरी तिचे ते म्हणणे डावलून, अन्य मदतीच्या कामासाठी माणसे मिळवायला सोय करावी लागते.
अशी ती शिवम्मा एक तर खुप पैकावाली व माणसे राखलेली असावी लागेल, शिवाय असा धंदा इतका सोपा व पैसे देणारा असेल तर तिचे सहकारी तिला मागे टाकून तेच या धंद्यात प्रतिस्पर्धी होतील. पण शिवाम्मा किंवा असे मांत्रिकाचे काम करणारे लोक खोपटात नगण्य परिस्थितीत जगत असतात आणि त्यांना अशी कंत्राटे देणारा ही असाच खेड्यातील जनसामान्य असतो असे समितीच्या लक्षात आले असेल.


'ए इकडे ये ग. हे चॉकलेट खा. मी तुला रसायन लावायला आली आहे' असे इतक्या सहजासहजी जे शक्य होणार नाही. पण पैसे देणाऱ्या व्यक्तिने तगादा लावला आहे की अजून कसे आग लावायचे भानामतीचे चाळे सुरू करत नाहीस. म्हणून शेवटी साहस करून त्या व्यक्तीला घरी आणून तिच्या शरीरातील व कपड्यांना ते रसायन फासायला मला नेलेच पाहिजे. तिकडे त्या गोठ्यात बांधलेल्या गाई कोठल्यातरी रसायने (certain chemicals - ज्याचे नाव शोधायचे काम समितीने आपणहून अंगावर घेतला होते तरीही ती अशास्त्रीय ढोबळ शब्द रचना करते) मिश्रित चारा खात नाहीत व पाणी पीत नाहीयेत. साधे त्यांच्या जरा जवळ गेले तर जनावरं अनोळख्याला ढुशा मारतात. रात्री जावे असा हाताशी घरलेल्या लोकांतर्फे घाट घातला तर आसपासच्या जनावरात हालचाल होते व घरातले लोक जागे होतात. पकडले जाऊ म्हणून मग परतावे लागते. अशी कैफियत वाचक म्हणून शिवम्मा असाल तर आपल्याला करावी लागली तर नवल नाही. पण समितीला त्याची फिकिर नाही.
श्री. गुलींनी असा सर्व शास्त्रीय विचार करून त्या शिवाम्माला असे विचारले असेल की मला माहित नाही असे 'सर्टन केमिकल' ते कुठले? की ज्यामुळे ते गाईंच्या पोटात गेले तर त्यांच्या आचळातून दुधाऐवजी रक्त पडेल? बर त्यांनी नाही विचारले, असे मानले तर डॉ. नरसिहय्यांच्या अध्यक्षतेखाली भानामती विरोधात मुद्दाम संघटित केलेल्या समितीने आपल्या कर्नाटक राज्याच्या सरकारी अहवालात तरी त्या कमिकल्सचे उल्लेख केले असले पाहिजेत आणि कर्नाटक सरकारच्या व सामान्य जनतेच्या समाधानाकरिता असे प्रात्यक्षिक त्यांनी सार्वजनिक ठिकाणीकरून दाखवले पाहिजे.
महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे वारे वहाते असून भानामती या प्रश्नावर विचार करून उपाययोजना करणारे ही आहेत. त्यांपैकी एका उपाययोजक निष्णातांनी पिवळा फॉस्फरस अचानक आग लावायला भानामतीचे खेळ करणारे व्यक्ती वापरत असावेत असा 'अंदाज' व्यक्त केला आहे. त्यावर भानामतीचा बंदोबस्त करणारे दुसरे निष्णात व्यक्ति म्हणतात की असले पोरकट तर्क वापरल्याने भानामती करणारी व्यक्ती मनोमन हसली असेल.
अशी खिल्ली उडवताना म्हणतात, 'अहो, श्री. निष्णात, बाजारात सहज उपलब्ध असणारे 'पदार्थ(?)' भानामती करणारे वापरतात. फॉस्फरससारखे सहजासहजी विकत न मिळणारे पदार्थ त्यांना उपलब्ध कसे व केवढ्याला पडतील याची कल्पना करा'. आता हे दुसरे श्री. निष्णात देखील भानामती करणाऱ्या व्यक्तीला बाजारात सहजासहजी विकत मिळणारी व अचानक पेट घेणारी वस्तू कोणती ते मात्र चुकून सांगत नाहीत...
माझा या लेखनातून फक्त शोध कार्य करणारे किती थातुर मातुर शब्दात शास्त्रीय विश्लेषणाची विल्हेवाट लावतात. जरा खोलवर विचार केला तर त्यातील त्रुटी लक्षात याव्यात असा आहे. डॉ. साती म्हणतात तसा कोणी कांगावा करून आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला लोक आले असतील. हे मान्य पण सरसकट असे माप लावू नका. शोध घ्या व मग ठरवा.

No comments:

Post a Comment