Friday, 7 December 2018

ऑल अबाऊ भा(बा)नामती! कशी करतात? कशी शोधावी? आणि फसवाफसवी थांबवावी!

ऑल अबाऊट बानामती - डेक्कन हेरॉल्ड

अंनिसवाले कसे गंडवतात आणि वर शेखी मिरवतात 
उदय व अन्य अंधश्रद्धा निर्मलून कार्यकर्ते मित्र हो,
टीओआय मधील लिंक वाचली. बातमी नेहमी कमी शब्दात व संपादून छापलेली असते. असे माझे मत आहे.म्हणून ती खोटी असे मी म्हणत नाही पण त्यातील सर्व विधाने सरसकट घेऊ नयेत असे मला वाटते.असो.
खालील एक ऑल अबाऊट बानामती - डेक्कन हेरॉल्ड मधील रिपोर्टची लिंक पुर्वी वाचनात आलीहोती.
त्यातील खालील उतारा ‘भानामती’ नावाचे काही घडत नसते, ती कशी नाही वा असू शकत नाही असे श्री. गुली नामक व्यक्तीने कर्नाटक सरकारच्या भानामतीच्या शास्त्रीय शोधाबद्दलच्या समितीतील एक सहकारी म्हणून शिवम्मा व अन्य लोकांची शारीरिक तपासणी करून सिद्ध केलेले आहे. म्हणून त्याला प्रत्यावाद नसावा.
त्यात ते म्हणतात,
“Towards this, Shivamma had called the girl to her house on April 15, and had applied chemicals on her body, and dress. This was probably some pyrogalic compound like lithium, which catches fire as soon as it comes in contact with water, Mr Guli said. Shivamma claimed before the villagers that this was through her powers of bhanamati. The girl’s elder sister, who is married, also caught fire in the same fashion a few days later, but she survived, he adds.
The examination of the dresses worn by both the victims showed traces of the chemicals used, he said. Moreover, Mr Guli points out that bhanamati cannot be practiced by a single person, as the main practitioner may claim. This has to be done by a group of people. While the main practitioner claims that he will do bhanamati on some person, his accomplices do all the physical work of applying chemicals to the victims as the case may be. They make a targeted cow drink certain chemicals which causes internal ruptures because of which it begins to yield blood instead of milk.”
ते म्हणतात, ‘probably’ (नक्की काय ते त्यांना माहित नाही पण) भानामती असल्याचे भासवणारे लोक ती 'काही काही रसायनांचा' वेळोवेळी उपयोग करून व काही लोकांना हाताशी धरून अशी परिस्थिती तयार करतात की त्यामुळे भानामती झाल्याचा आभास निर्माण होतो. हे स्पष्टीकरण ‘सत्य व नक्की पडताळा करून ठरवलेले आहे’ असे मानावे असा विज्ञानवाद्यांचा आग्रह असणार नव्हे असतो. असे हातचलाखीचे वा रसायनिक पदार्थांचे वापर करून जादुई प्रयोग करणारे अनेक आहेत.
आता वरील कथनावर वाचकाने असा विचार करावा - मीच शिवम्मा आहे. कर्नाटकातील एका खेड्यात राहाते -तो. मला एकावर मुलीवर-बाईवर आणि काही गाईंवर भानामतीचा प्रयोग करायला एकाने वैयक्तिक वितुष्टामुळे पैसे देऊन तयार केले आहे.
आता मला श्री. गुली म्हणतात तसे 'पायरोगॅलिक मिश्रणासारखे लिथियम' नावाचे रसायन अचानक आग लावायसाठी मिळवायला हवे. लिथियमला सामान्य कानडीभाषेत काय म्हणतात, ते मला घरगुती तयार करता येत नसेल तर कुठल्या किराण्याच्या वा केमिस्टच्या दुकानात मिळते, केवढ्याला व किती प्रमाणात याचा विचार करायला हवा. समजा पैशाची, रसायनाची तयारी मी केली. आता मला ते हव्या त्या व्यक्तिच्या शरीराला लावायला मिळण्यासाठी योग्य संधी हवी. ती मुलगी जी नंतर मेली, आपणहून हे सर्व करायच्या आधी शिवम्माकडे का व कशी गेली. नंतर आग लागेपर्यंत घरच्यांना काही कशी बोलली नाही. बर ती गेली तर गेली, तिची विवाहित बहिण ही नंतर काही दिवसांनी शिवाम्माकडे गुपचुप गेली पण कर्मधर्मसंयोगाने ती आगीतून वाचली...असो.
जे लोक अशी कामे हातात घेतात त्यांचे आधीच्या केसेस हाताळून पैशाने खिसे भरलेले असले पाहिजेत. आता श्री गुली म्हणतात की सत्यसोधक समितीला उत्तरे देतानाशिवम्मा सर्व गावकऱ्यांसमक्ष, मी एकटीच भानामतीच्या शक्तीने हे साध्य करते असे जरी म्हणाली असली तरी तिचे ते म्हणणे डावलून, अन्य मदतीच्या कामासाठी माणसे मिळवायला सोय करावी लागते.
अशी ती शिवम्मा एक तर खुप पैकावाली व माणसे राखलेली असावी लागेल, शिवाय असा धंदा इतका सोपा व पैसे देणारा असेल तर तिचे सहकारी तिला मागे टाकून तेच या धंद्यात प्रतिस्पर्धी होतील. पण शिवाम्मा किंवा असे मांत्रिकाचे काम करणारे लोक खोपटात नगण्य परिस्थितीत जगत असतात आणि त्यांना अशी कंत्राटे देणारा ही असाच खेड्यातील जनसामान्य असतो असे समितीच्या लक्षात आले असेल.
'ए इकडे ये ग. हे चॉकलेट खा. मी तुला रसायन लावायला आली आहे' असे इतक्या सहजासहजी जे शक्य होणार नाही. पण पैसे देणाऱ्या व्यक्तिने तगादा लावला आहे की अजून कसे आग लावायचे भानामतीचे चाळे सुरू करत नाहीस. म्हणून शेवटी साहस करून त्या व्यक्तीला घरी आणून तिच्या शरीरातील व कपड्यांना ते रसायन फासायला मला नेलेच पाहिजे. तिकडे त्या गोठ्यात बांधलेल्या गाई कोठल्यातरी रसायने (certain chemicals - ज्याचे नाव शोधायचे काम समितीने आपणहून अंगावर घेतला होते तरीही ती अशास्त्रीय ढोबळ शब्द रचना करते) मिश्रित चारा खात नाहीत व पाणी पीत नाहीयेत. साधे त्यांच्या जरा जवळ गेले तर जनावरं अनोळख्याला ढुशा मारतात. रात्री जावे असा हाताशी घरलेल्या लोकांतर्फे घाट घातला तर आसपासच्या जनावरात हालचाल होते व घरातले लोक जागे होतात. पकडले जाऊ म्हणून मग परतावे लागते. अशी कैफियत वाचक म्हणून शिवम्मा असाल तर आपल्याला करावी लागली तर नवल नाही. पण समितीला त्याची फिकिर नाही.
श्री. गुलींनी असा सर्व शास्त्रीय विचार करून त्या शिवाम्माला असे विचारले असेल की मला माहित नाही असे 'सर्टन केमिकल' ते कुठले? की ज्यामुळे ते गाईंच्या पोटात गेले तर त्यांच्या आचळातून दुधाऐवजी रक्त पडेल? बर त्यांनी नाही विचारले, असे मानले तर डॉ. नरसिहय्यांच्या अध्यक्षतेखाली भानामती विरोधात मुद्दाम संघटित केलेल्या समितीने आपल्या कर्नाटक राज्याच्या सरकारी अहवालात तरी त्या कमिकल्सचे उल्लेख केले असले पाहिजेत आणि कर्नाटक सरकारच्या व सामान्य जनतेच्या समाधानाकरिता असे प्रात्यक्षिक त्यांनी सार्वजनिक ठिकाणीकरून दाखवले पाहिजे.
महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे वारे वहाते असून भानामती या प्रश्नावर विचार करून उपाययोजना करणारे ही आहेत. त्यांपैकी एका उपाययोजक निष्णातांनी पिवळा फॉस्फरस अचानक आग लावायला भानामतीचे खेळ करणारे व्यक्ती वापरत असावेत असा 'अंदाज' व्यक्त केला आहे. त्यावर भानामतीचा बंदोबस्त करणारे दुसरे निष्णात व्यक्ति म्हणतात की असले पोरकट तर्क वापरल्याने भानामती करणारी व्यक्ती मनोमन हसली असेल.
अशी खिल्ली उडवताना म्हणतात, 'अहो, श्री. निष्णात, बाजारात सहज उपलब्ध असणारे 'पदार्थ(?)' भानामती करणारे वापरतात. फॉस्फरससारखे सहजासहजी विकत न मिळणारे पदार्थ त्यांना उपलब्ध कसे व केवढ्याला पडतील याची कल्पना करा'. आता हे दुसरे श्री. निष्णात देखील भानामती करणाऱ्या व्यक्तीला बाजारात सहजासहजी विकत मिळणारी व अचानक पेट घेणारी वस्तू कोणती ते मात्र चुकून सांगत नाहीत...
माझा या लेखनातून फक्त शोध कार्य करणारे किती थातुर मातुर शब्दात शास्त्रीय विश्लेषणाची विल्हेवाट लावतात. जरा खोलवर विचार केला तर त्यातील त्रुटी लक्षात याव्यात असा आहे. डॉ. साती म्हणतात तसा कोणी कांगावा करून आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला लोक आले असतील. हे मान्य पण सरसकट असे माप लावू नका. शोध घ्या व मग ठरवा.

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?


विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
मित्र हो, 
आपण कडेगावच्या भानामतीची केस - प्रकरण 1 मधे वाचलीत. ती वाचून मी प्राचार्य अद्वयानंद गळतगे कोण? हे लिखाण का करत आहे? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो. त्यासाठी आपण माझा विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे? याची भूमिका काय? ते वाचावे म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होईल.

भूमिका


मोरा-अंगी असोसे। पिसे असती डोळसे।।
परि एकली दृष्टी नसे। तैसे ते गा ।। - ज्ञाने. 13.835
अर्थ – मोराच्या अंगावर डोळ्यासारखी पुष्कळ पिसे असतात. पण त्यांचा पाहण्यासाठी काहीच उपयोग नसतो. त्याप्रमाणे एकटी (अध्यात्मज्ञानाची) दृष्टी नसेल तर इतर (पुष्कळ शास्त्रांच्या ज्ञानाची) दृष्टी असून काय उपयोग(ते लोक आंधळेच असतात)
काही महत्वाचे संदर्भ –
  सारख्याच दिसणाऱ्या समान तीन बालकांच्या मुर्तींप्रमाणेच शास्त्रज्ञांचेही तीन वर्ग पडतात. एक, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार रुढ विज्ञानाच्या नियमात बसत नसल्यामुळे खोटे म्हणून सोडून देतात. दुसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार खरे म्हणून स्वीकारले तर आपली शास्त्रज्ञ म्हणून असलेली इभ्रत जाईल या भितीने ते मनातच ठेऊन घेणारे; आणि तिसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार दुसऱ्यांना सांगणारे व त्यांच्या खरेपणाची शहानिशा करून घेण्यासाठी शास्त्रीय संशोधनाचा जाहीर आग्रह धरणारे. हा ग्रंथ शेवटच्या शास्त्रज्ञांच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो.
या ग्रंथाची भूमिका शुद्ध विज्ञानवादी आहे. (शुद्ध विज्ञान म्हणजे कुठलीही तत्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान)शुद्ध विज्ञानात दैवी शक्तीला (Divine Power) किंवा परमेश्वराला (Personal God) अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्यांची नैसर्गिक (natural)उपपत्ती शोधते. पण नैसर्गिक उपपत्ती हे दुधारी शस्त्र आहे. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जडवादी तत्वज्ञानावर ही प्रहार करते. आणि हीच जडवादी लोकांची सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून ते या शुद्ध विज्ञानरुपी शस्त्राच्या दुसऱ्या धारेकडे नेहमी व पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत असलेले दिसून येतात. ती धार जणु अस्तित्वातच नाही असे ते समजतात – नव्हे ते त्यांचे गृहितकृत्य असून त्या गृहितकृत्यावरच त्यांचे तथाकथित विज्ञान उभे आहे. याविज्ञानाला आत्मवंचक  - अर्थात डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराच्या जातीचे व म्हणून खोटे विज्ञान म्हणता येईल. या आत्मवंचक व खोट्या विज्ञानाला उघडे पाडणे , त्याचे खरे स्वरूप वाचकांपुढे ठेवणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.
“ अशा अनेक नैसर्गिक घटना आहेत ज्यांचा कार्यकारणभाव मानवाला माहित झालेला नाही. प्रश्न असा आहे की अशा घटनांची आदिकालिक मानवाप्रमाणे चमत्कार म्हणून पुजा करायची का? की  त्याच्या पाठीमागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ? की अशा घटना घडतच नाहीत, घडणे शक्य नाही असे म्हणून शत्रूला पाहून वाळूत डोके खुपसणाऱ्या शहामृगाची भूमिका स्वीकारायची? दुर्दैवाने काही शास्त्रज्ञ अशी भुमिका स्वीकारताना दिसून येतात.ही भूमिका आत्मवंचक, अवैज्ञानिक व म्हणून त्याज्य होय, हे या याग्रंथात वाचकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.
या ग्रंथाच्या मथळ्याविषयी थोडेसे  ....  व अन्य मजकूर
....  शिवाय
  •   सादर अर्पण
  •   अनुक्रमणिका
  • मुखपृष्ठावरील चित्र
  •   प्रकाशक
  माहिती 'ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे' या ब्लॉगवर


येथे वाचा

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्मपुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

लेखक – प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक – 9902002585
वेदान्त विवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-.
हे पुस्तक पुर्वी विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळे असले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञान म्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतः सत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीत असूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष रीतीने का होईना) होते, म्हणून भौतिक जगाचा वैज्ञानिक अभ्यास (भौतिक संशोधन) हा अध्यात्मिक सत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे असे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे या पुस्तकातून प्रतिपादन आहे. त्यांचे सर्व लेख अशा संगतवारीने आहेत की ते पुस्तकाच्या शीर्षकाला न्याय देतात.
या सुसंगत संकलनात लेखकाचा अप्रतिहत सर्वांगिण व्यासंग व भाषेवरील प्रभूत्व, सुक्ष्म व सखोल चिंतन थक्क करणारे आहे. विशिष्ट हेतू मनांत ठेऊन लेखन करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांना गीतेसारख्या ग्रंथांचे विकृतीकरण केल्याशिवाय स्ववैशिष्ठ्यवादी म्हणून सन्मान मिळत नाही.अशांचा खरपुस समाचार लेखकाने घेतला आहे.
चार्वाकवादावर लेखन करताना ते म्हणतात, चार्वाकांच्या प्रत्यक्ष प्रामाणवादचे तत्व (जेथे धूर आहे तेथे अग्नी आहे हे अनुमानाने सिद्ध होत नाही. अग्नीचे अस्तित्व केवळ प्रत्यक्षाने सिद्ध होते.) स्वीकारणे विज्ञानाला अशक्य आहे. कारण विज्ञानाचा जन्मच अनुमानातून झाला आहे. तर चार्वाक त्या अनुमानालाच ठोकरून देतात.
चार्वाकांचा देहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतील यंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेक उदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्या कसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठी जगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी, विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय?शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे कायअसा प्रश्न करून निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.
प्रकरण 2 मधे  प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी प्रामाण्यवादाच्या पुरस्कर्त्यांना इशारा दिला आहे. सत्य जाणण्याचे अंतिम प्रमाण भौतिक नसून आत्मिक (अनुभाविक) आहे. त्यासाठी भौतिक प्रमाणवाद टाकून अनुभवप्रमाणवादी बनणे आवश्यक आहे. नेमके तेच कथन क्वांटम सिद्धांतातपरस्पर विरोध (पॅरॉडॉक्सिकल) रुपाने, तर अध्यात्मशास्त्रात सदसद्विलक्षणरुपाने सांगितला जातो असे ते म्हणतात.
प्रकरण 3 मधे जीवोत्पत्ती हे रुढ जीवशास्त्राला न सुटलेले कोडे यात ते म्हणतात, जीव हा तुकड्यांनी बनलेला नाही तर माहितीने बनला आहे. योगायोगाने नव्हे तर नियमानुसार निर्माण झाला आहे. अपघाताने नव्हे तर स्वाभाविकपणे बनला आहे असे संगणकयंत्राने गणितीय नियमांनी दाखवून दिले आहे. मात्र अडचणीची समस्या सोडवण्यासाठी काही शास्त्रज्ञ ती समस्या टाळण्याचा किंवा नसल्याचा प्रयत्न करताना दिसतात. तो कसा खोटा आहे हे लेखकाने सप्रमाण दाखवून दिले आहे.
प्रकरण 4 प्लँचेट या रंगतदार विषयाला वाहिलेले आहे. त्याचे नियम, विलक्षण अनुभव, पाश्चात्यांनी त्यावर केलेले प्रयोग सर्व माहिती नवी आहे. प्लँचेट करून मिळणारी उत्तरे कोण देतो? यावर त्यांचे मत मोलाचे आहे. ते म्हणतात की मानवी मनाच्या अतींद्रिय शक्तीचे ते रुप आहे.
प्रकरण 5 ज्योतिषशास्त्रातील ग्रह मानवावर प्रभाव पाडतात काय? यावर प्रश्नावर आधारित आहे. त्यांना तो प्रभाव हा एका व्यवस्थेचा भाग म्हणून मान्य आहे. त्यात नाडी ग्रंथांवर भाष्य करताना ते म्हणतात. फलज्योतिष हे कुंडलीवरून वर्तवलेले भविष्य असते. याच्या उलट नाडीग्रंथ भविष्य हे कुंडलीचेच भविष्य असते. म्हणजेच एखाद्या व्यक्तिचे भविष्य वर्तवण्य़ासाठी तिच्या कुंडलीची आवश्यकता नाडीग्रंथाला मुळीच नाही, कारण तिच्या कुंडलीचे भविष्यच नाडीग्रंथ वर्तवतात. त्यांनी यावरून असा निश्कर्ष काढला आहे की कुंडली किंवा ग्रह व त्या ग्रहस्थितीप्रमाणे जन्म घेणारी व्यक्ती म्हणजेच मानवी जीवन व ग्रहांची भ्रमणे ही दोन्ही एकाच व्यवस्थेने निश्चित होत असतात. म्हणजेच ती एकाच व्यवस्थेचे अंग असतात व मानवावर ग्रहा-नक्षत्रांचा परिणाम होतो काय? ही जटिल समस्या जटिल तर नाहीच पण समस्याही राहात नाही.
प्रकरण 6 संतसाहित्यातून अंधश्रद्धा निर्मूलन कसे केले आहे? यावर प्रकाश पाडणारे आहे. मात्र संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्यावहारिक पातळीवरील असून ते बेगडी, तोंडदेखले व निरीश्वरवादी लोकांनी ठरवलेल्या साच्याचे नाही. असे त्यांनी विविध संतवचनांची वचने देऊन ठासून सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. नी.र. वऱ्हाडपांडे निर्मित संताच्या चमत्कारवादातील भ्रामक कथनातून त्यांनी वाचकांची दुहेरी वैचारिक फसवणूक कशी केली आहे याची चिरफाड केली आहे. संतांची इच्छा असेल तेंव्हा संतांना चमत्कार करता येतातहे डॉ. वऱ्हाडपांड्यांचे कथन खोटे आहे. हे प्राचार्य अद्वयानंद गळतगे त्यांनी,संतांच्या जीवनात चमत्कार आपोआप घडतात. ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून नाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलविले ते संत म्हणून नाही तर योगी म्हणून आणि योग हे भौतिक शास्त्राप्रमाणेच एक काटेकोर शास्त्र आहे’, असे प्रतिपादन केले आहे.  
प्रकरणे 7 ते 10 मधून प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीं काही विवेकवादी लेखकांनी भगवद्गीतेतील कथनांना समस्या ठरवून वाद उकरण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर आधारित आहेत. त्यातील प्रकरण 7 मधे ज्ञानेश्वरीतील विश्वोपत्तीच्या निरुपणावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी वैज्ञानिक दृष्ट्या प्रकाश टाकला आहे. तर प्रकरण 8 मधे गीतेतील नवव्या अध्यायासंदर्भात ज्ञानेश्वरांनी (काहीही) न करता भजन जाहले म्हटले आहे, त्याचा मतितार्थ कसा लावावा किंवा कसा लावू नये? याचा वस्तुपाठ आहे. ते म्हणतात, प्रत्येक कर्म परमेश्वराप्रित्यर्थच आहे हे जो जाणतो किंवा असे जाणून प्रत्येक कर्म करतो तो परमेश्वराचे भजनच करतो. कारण त्याच्या त्याजाणण्यामुळे ते कर्म परमेश्वरालाच पोहोचते. पण हे जो जाणत नाही त्या अज्ञानी मुर्खाच्या हातून हे परमेश्वराचे सहज (न करता) होणारे भजन घडत नाही.
प्रकरण 9 मधे गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, गीता नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे काय?, आत्मा हा डब्यातील लाडवा प्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?, गीता कथनाला युद्धभूमि  योग्य किंवा अयोग्य?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा? आदि प्रश्नांची उकल करून त्यातील वैचारिक फोलपणा उकलून दाखवला आहे. प्रकरण 10 मधे गीतेचे अधिकारी कोण? असा नेहमी विचारला जाणारा प्रश्न उत्पन्न केला आहे. त्यावर समर्पक उत्तर देताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा दृष्टांत देताना म्हणतात, तैसे अध्यात्मशास्त्री इये। एक अंतरंगचि अधिकारिये। येर वाक् चातुर्ये। होईल सुखिया।। म्हणजे एक अंतरंगी व्यक्तीच गीतेची अधिकारी आहे. बाकीचे (येर) बहिरंग गोष्टींमुळे सुखी होतात. ते कसे? तर-  वधूची आई वरात श्रीमंती पहाते, बाप वरात शिक्षण पहातो, भाऊबंद वरात जात पहातात, इतर लोक वराचे मिष्टान्न पाहून खुष होततात. असा रीतीने इतर लोक अवांतर गोष्टीं पसंत करतात. एकटी वधूच वराला वर म्हणून निवडते, पसंत करते. म्हणजेच जन्माचा सोबती म्हणून निवडते. म्हणून तिचा एकटीचाच वरावरअधिकार चालतो. इतर कुणाचाच नाही. गीतेच्या अधिकारी व्यक्तिबद्दलही तसेच आहे. कारण त्याला गीता ही जन्माची सोबती (जीवनाचार) म्हणून निवडाची असते.
प्रकरण 11 हे या पुस्तकाचा मुकुटमणी आहे. अष्टावक्र गीता अर्थात कैवल अदैत वेदांत - म्हणजे काय?’ राजा जनकाला आठ ठिकाणी वाकलेल्या योग्याने केलेला उपदेश व श्री कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश यातील तुलना, केवल वेदांतातील दृष्टीसृष्टीवाद तो काय? मुक्त पुरुष जगात कसा वावरतो?दृष्य़ जग व देह हे खोटे कसे ? यावरील त्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले विवेचन रंजक आहे. अनेक उपनिषदांचे, संतांचे व पाश्चात्य विचारकांचे संदर्भ देण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या लेखनातून प्राचार्य अद्वयानंद गळतगे हे ज्ञानी व्यक्तिमत्व स्वानुभवविश्वाचे माणिक-मौत्तिकांचे आगरआहेत असे जाणवते.
    

Monday, 6 August 2012

लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात?

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9


 लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात?
कोणतेही मत अनुभव आल्याशिवाय कोणी बनवत नाही. रुढ विज्ञानाच्या नियमात न बसणाऱ्या घटनांचा अनुभव आल्याशिवाय त्या घटना शक्य असल्याचे मत कोणी नोंदविणार नाही. निदान असे अनुभव आलेल्या जवळच्या व्यक्तिंचा परिचय तरी त्यांना असला पाहिजे असे अनुभव आलेल्या व्यक्तिंची संख्या प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे. असे अनुभव आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने असतील तर आपला अनुभव जाहीर करणाऱ्यांची संख्या ही मोठी असावयास पाहिजे. पण ती तशी दिसत नाही. यावर कोणी प्रश्न विचारील. त्याला उत्तर – ‘तशी संधी त्यांना मिळत नाहीहेच आहे. खाजगीत ते आपला अनुभव सांगत असतातच. तसा प्रसंग उद्भवला तर आपला अनुभव जाहीरपणे सांगायला मागे पुढे पहात नाहीत, असे आढळून आले आहे. त्याचे एक अलिकडील घडलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे भूतपुर्व सभापती व प्रसिद्ध विचारवंत दिवंगत वि. स. पागे  यांनी आपल्याला आलेल्या एका चमत्काराच्या अनुभवाचे एका जाहीर सभेत केलेले कथन होय.
अशाच प्रकारच्या एका चमत्कारचा अनुभव प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक गजानन जागीरदार यांना आपल्या जीवनात आला. आणि तो त्यांनी आपल्या पाऊलखुणाया आत्मचरित्रात कथनाच्या ओघात सांगितला. त्याची चैतन्य देशमुख नावाच्या लेखकाने कोल्हापुरच्या पुढारी दैनिकातून मरता क्या नहीं करताया मथळ्याच्या लेखाने जाहीर वाच्यता केली. संपादकांनी या लेखावर वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. मात्र त्या मागवताना आपण या घटनेकडे बुद्धिवादी दृष्टीकोनातून पहात असून वाचकांनी ही तसेच पाहावे असे आवाहन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून या घटनेची विज्ञानवादी उकल करणारा लेख मुद्दाम लिहून घेऊन प्रसिद्ध केला. दाभोळकरांचा तो लेख म्हणजे विज्ञानाच्या रुढ नियमांच्या चौकटीत ही घटना ओढूनताणून बसविण्याचा एक आडदांड प्रयत्न असून तो लिहून व प्रसिद्ध करून अनुक्रमे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पुढारीचे संपादक यांनी गजानन जागीरदारांवर घोर अन्य केला आहे. तो कसा केला आहे, हेच तेथे त्या लेखाची शास्त्रीय निकषांच्या आधारे छाननी करून दाखवून द्यायचे आहे.
त्या प्रकरणातील महत्वाच्या बाबी:-
             पाऊलखुणा आत्मचरित्रातील संबंधित भाग पुर्ण उद्घृत करीत आहे.
             जागीरदारंची एका चमत्काराची पाऊलखूण
             मंत्रातंत्रावर विश्वास ठेवायचा का?
             ‘अंधश्रद्धा विनाशायपुस्तकातील प्रकरणातील उल्लेख
             या घटनेतील मुख्य प्रसंग
             दाभोळकरांच्या हवेतील वावड्या
             जागीरदारांनी परमेश्वराचे आभार का मानले?
             संभवनयती सिद्धाताविषय़ीचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे घोर अज्ञान
             डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे संमोहन-प्रक्रिये विषयीचे अज्ञान व मिथ्याकथन
             जेंव्हा सर्व युक्तिवाद संपतात
             आमचेही एक लाख रुपयांचे आव्हान आहे, स्वीकारा!
             हे घ्या पं. शर्मांच्या बाजूने पुरावे.
             खुर्चीच्या चमत्कारासारखा आणखी एक चमत्कार
             वाचकांच्या प्रतिक्रिया

हे प्रकरण इथे वाचा

बुद्धिप्रामाण्यवाद आणि परामानसशास्त्र


प्रकरण 3 
 बुद्धिप्रामाण्यवाद आणि परामानसशास्त्र

प्रस्तावना

विश्वाचे ज्ञान केवळ पाच ज्ञानेंद्रियांमार्फतच ( किंवा त्यांची शक्ती वाढवणाऱ्या वैज्ञानिक उपकरणांमार्फतच होऊ शकते असे बुद्धिवाद मानतो. विश्वाचे ज्ञान तर्काने होऊ शकते - विश्व बुद्धिगम्य आहे - या बुद्धिवाद्यांच्या श्रद्धेला आधुनिक भौतविज्ञानातील शोधांनीच त़डा गेला असून ही श्रद्धा भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने तरी निराधार असल्याचे दिसून आले आहे. हे मागील दोन प्रकरणात आपण पाहिले. प्रस्तूत तिसऱ्या प्रकरणात मानवाच्या पंचेंद्रियांमार्फतच विश्वाचे ज्ञान होऊ शकते ही बुद्धिवाद्यांची जी दुसरी श्रद्धा आहे , ती कितपत बरोबर आहे हे पाहावयाचे आहे.


 ऐतिहसिक दृष्ट्या अतींद्रियशक्ती हा विषय भुताटकी, अंगात येणे, जादू टोणा, चेटूक आदी गोष्टींशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे पहाण्याचा माणसांचा दृष्टिकोण कधीच निः पक्ष किंवा शास्त्रीय राहू शकलेला नाही. नेहमीच तो भावनात्मक राहिला आहे. त्यामुळे याविषयाच्या बाबतीत नेहमीच अगदी टोकाचे दृष्टिकोण आढळून येतात. एकः याविषयी आंधळी श्रद्धा बाळगणे म्हणजे याविषयी पुराव्यांचा विचार न करता सर्व काही खरे असते असे मानणे व दुसरेः याविषयी आंधळी अश्रद्धा बाळगणे म्हणजे याविषयी पुराव्याचा विचार न करता सर्व काही  खोटे असते, असे मानणे. याविषयी खरे खोटे निवडणारा शास्त्रीय दृष्टिकोण असू शकतो हे कळायला मनुष्याला नेहमी जड गेल्याचे दिसून येते. 
     याबाबतीत पुरुषाच्या स्त्रीकडे पाहण्याच्या ऐतिहासिक दृष्टिकोणाची तुलना करण्यासारखी आहे. इतिहासावरून दिसून येते की, पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोण कधीच निःपक्ष किंवा शास्त्रीय राहिलेला नाही. नेहमीच तो भावनात्मक राहिलेला आहे. या ऐतिहासिक - पौराणिक दृष्टीतून पाहता असे दिसून येते की, पुरुषाने स्त्रीला एक तर देवता (किंवा जगन्माता) मानलेली आहे, नाहीतर चेटकीण (भोगदासी) मानलेली आहे. तिला बरोबरीचा माणूस म्हणून मानणे त्याला नेहमीच जड गेल्याचे दिसून येते. समाजशास्त्राने स्त्रिचा शास्त्रीय दृष्टीकोणातून विचार करून तिला जसे पुरुषाबरोबरीचे समाजात स्थान दिले आहे तसे परामानस शास्त्राने अतींद्रिय विषयाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहून त्याला विज्ञानात इतर वैज्ञानिक विषयाबरोबरीचे मानाचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्रीला भोगदासी (किंवा चेटकीण) मानणाऱ्या जुन्या पुरुषप्रधान समाजातील पुरुषांप्रमाणे किंवा तिला देवता मानणाऱ्या धर्ममार्तंडांप्रमाणे अतींद्रिय हे थोतांड मानणारे प्रस्थापित विज्ञानवादी व बुद्धिवादी आणि अतींद्रियातील सर्वच चमत्कार खरे मानणारे अंधश्रद्धाळू हे दोघेही अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे! 
   
 बुद्धिवाद विज्ञानाच्या प्रगतीतील एक अडथळा

मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने एक तर्क केला आहे की मध्ययुगातील अंधश्रद्धा व जादूटोणा याविरुद्ध विज्ञानाने मिळवलेला विजय अतींद्रिय शक्तिचे अस्तित्व मान्य केले तर वाया जाईल अशी शास्त्रज्ञांना भिती वाटते व पुन्हा अंधश्रद्धेचा सुळसुळाट होईल हा तर्क कितपत योग्य आहे हे सांगता येत नाही. खरे कारण माझ्यामते भावनिक आहे. काही लोकांना आपल्या आवडत्या सिद्धांताविरुद्ध एखादी घटना घडते, हेच मान्य होत नाही. ती घडावी ही गोष्टच त्यांना आवडत नाही, आणि जी गोष्ट आवडत नाही ती घडतच नाही असे ते मानतात. मग तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा ती खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हे दोनच पर्याय त्यांच्या पुढे उरतात. ती खोटी आहे हे सिद्ध करणे कठीण असल्यामुळे याविषयी प्रयोग करणाऱ्यांच्या हेतू विषयीच मग शंका घेण्यात येते. अतींद्रिय शक्तींवरील प्रयोगाबाबत लबाडी(Fraud) चा आरोप वरचेवर का करण्यात येतो याचा यावरून उलगडा होईल.
काही शास्त्रज्ञ मात्र अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व अज्ञानातून किंवा निव्वळ आडमुठेपणातून नाकारतात, ही वस्तुस्थिती आहे. याविषयी आयसेंक हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, एखाद्या क्षेत्रात नैपुण्य(Specialization) संपादन केलेल्या शास्त्रज्ञाचे मत इतर त्याने नैपुण्य न संपादलेल्या विषयात प्रमाण म्हणून स्वीकारणे धोक्याचे असते. कारण त्यात त्याचे ज्ञान शून्य असल्यामुळे आपल्या नैपुण्यक्षेत्रातील पुर्वग्रह त्यात घुसडून तो त्या विषयी आडमुठेपणा (pigheadedness) स्वीकारतो."
बऱ्याच तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे अतीद्रिय विषयक धोरण असे आडमुठेच आहे आणि त्याचे हेच कारण आहे. आता कोणी म्हणेल की, अतींद्रिय शक्तिंचे अस्तित्व वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केल्यानंतर सुद्धा ते आडमुठेपणाने नाकारणारे शास्त्रज्ञ खरोखरीच कोणी आहेत काय?  ही पहा उदाहरणे –
वॅरन वीव्हर हा कम्युनिकेशन (दळणवळण) सिद्धांताचा संस्थापक शास्त्रज्ञ म्हणतो, ‘अतींद्रिय शक्ती मला बौद्धिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी आणि मनाला यातना देणारी वाटते आणि म्हणून जे. बी. ऱ्हाईन यांनी सादर केलेले तिच्या अस्तित्वाविषयाचे पुरावे मला नाकारता येत नसले तरी ते मी स्वीकारत नाही’.
हेब हा मानसशास्त्रज्ञ खुलेपणाने म्हणतो, ‘अतींद्रिय शक्तींचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आणखी (further)पुराव्याची आपल्याला आता गरज नाही, कारण त्या शक्तीच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. ती तर्काविरुद्ध व बुद्धिला न पटणारी आहे, आणि म्हणून ती आपल्याला मुळीच मान्य नाही’.
विल्यम जेम्स या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञापुढे एका आघाडीच्या जीवशास्त्रज्ञाने पुढील उद्गार काढल्याचे जेम्स याने आपल्या, ‘The Will to Believe’ या ग्रंथात म्हटले आहे. हा जीवशास्त्रज्ञ म्हणतो, अतींद्रिय शक्ती खरी असली तरी शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ती दडपून टाकली पाहिजे. किंवा सर्वापासून ती लपवून ठेवला पाहिजे. कारण निसर्गाच्या एकवाक्यतेला (Uniformity of Nature) त्यामुळे बाधा येते व विज्ञानाचे कार्य चालणे अशक्य होते.'
बुद्धिला पटत नाही म्हणून किंवा मनाला यातना होतात म्हणून एखादे सत्य झाकून ठेवून विज्ञानाचे कार्य करणाऱ्या या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक दृष्टिकोणाविषयी काय बोलावे! नको असलेले वैज्ञानिक सत्य दडपून टाकू इच्छिणारे हे शास्त्रज्ञ मूल रडू लागले तर त्याला स्तनपान देण्याऐवजी त्याच्या तोंडात बोळा कोंबायला सांगतील अशा पद्धतीने  विज्ञानाचे कार्य करणे बुद्धिवाद्यांना आवडत असले तरी शास्त्रज्ञांनी तसे करणे ही विज्ञानवृत्तीशी प्रतारणा ठरेल. कारण बुद्धिला न पटणाऱ्या गोष्टी स्वीकारणे, हे विज्ञानाचे पहिले आद्यकर्तव्य असल्याचे विज्ञानाच्या जन्माचा इतिहासच सांगतो.  या शिवाय

Saturday, 2 June 2012

 अंधश्रद्धानिर्मूलनवाद्यांची एक फसवी भलावण 
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 5
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 5

लोणावळ्याच्या र्स्ट व्हू वे तर्फे प्रसिद्ध झालेल्या 1989 च्या मनशक्तीच्या दिवाळी अंकातील अंधश्रद्धा निर्मूलनातील गूण आणि धोके या लेखामुळे प्रस्तूत लेखकाला अनिच्छेने या संबंधी पुन्हा थोडे लिहावे लागत आहे. (असा लेख दुसरा कोणी लिहिला असता तर त्याची त्याने दखल घेतली नसती. पण ज्याने एके काळी अंधश्रद्धा निर्मूलन वाद्यांचा खोटारडेपणा जाहीरपणे वेशीवर टांगला होता, त्या रेस्ट व्हू वे ने (लेख कोणी लिहिला हे  नमूद नसल्याने असा उल्लेख केला. तथापि काही काळाने हा लेख स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिला आहे आणि आपले (गळतगे यांचे) लेखन ते आगत्याने वाचत असतात. असे मनशक्तीच्या विश्वस्तांकडून कळवण्यात आले) असा लेख लिहावा हे त्याला खटकले. म्हणून हा लेखन प्रपंच करावा लागत आहे )
उपर्युक्त अंकात अंनि वाद्यांमधे चार गूण असल्याचे म्हटले आहे. त्यात पान 277 वर पुढील विधाने केलेली आहेत.  अंधश्रद्धेविरुद्ध लढाई लढताना त्यातील काही जण *अतिरेक करत असतील... टोकाची भूमिका घेत असतील. प्रसंगी त्या सोसून ही त्यांना साथ दिली पाहिजे. चांगल्या गोष्टींमधे आव्हानापेक्षा  आवाहनाची गरज आहे. ...
.... या बाबत प्रश्न असा, की आव्हानापेक्षा आवाहनाची गरज आहे, या सल्याची वास्तविक गरज कोणाला आहे? आव्हाने कोण देतो असतात? ... पण सर्वात महत्वाचा प्रश्न असा उद्भवतो की अंधश्रद्धा निर्मूलन हे समाजकार्य असताना त्याचा अतिरेक कसा संभवतो? ('समाजकार्याचा अतिरेक' ही कल्पनाच करता येत नाही) उपर्युक्त लेखात या गोष्टींची चर्चा न करता इतर बरेच काही लिहिलेले आहे. मुख्य प्रश्न असा आहे , की ज्या विज्ञानच्या नावाखाली ही चळवळ सुरू आहे त्या विज्ञानाची दृष्टी ही चळवळ करणाऱ्या लोकात आहे काय? खरे तरवैज्ञानिक दृष्टी असेल तर अतिरेकाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आणि वादही निर्माण होत नाही. विज्ञानाच्या नावाखाली टोकाची भूमिकाच घेणे शक्य नाही. विज्ञानाच्या कसोट्या सार्वजनिक, वस्तुनिष्ठ, आणि वादातीत असतात. त्या ठिकाणी अतिरेक आणि टोकाची भूमिका संभवतच नाही. अतिरेक होतो तो अवैज्ञानिक दृष्टीकोन बाळगल्यामुळे (फालतू गोष्टींचा विचार केल्यामुळे) होय. आणि अंनिवाद्यांकडून अतिरेक होतो याचे कारण अंनिवाद्यांत वैज्ञानिकतेचा अभाव आहे, हेच आहे. म्हणून प्रस्तूत लेखकाचा प्रश्न आहे की, अं.श्र. नि वाद्यांच्या (या अवैज्ञानिक दृष्टीकोनामुळे निर्माण झालेल्या ) अतिरेकाचे उपर्युक्त लेखक कसे समर्थन करतो आणि त्यांना साथ देण्याचा इतरांना कसा सल्ला देतो? खालील उल्लेखांवर इथे वाचा

  • मार्टीन गार्डनरच्या पुस्तकाचा हवाला
  • गार्डनरच्या बहुचर्चित मनाच्या मोकळेपणाच्या विधानाचा खरा अर्थ
  • गार्डनर यांना आपण बुद्धिवादी पुर्वग्रह(RATIONAL PREJUDICE)पाळत असल्याचे कबूल

* अतिरेक याचा अर्थ 'एखाद्या  गोष्टीचा अती आग्रह धरणे' असा होत असता तरी सत्याचा आग्रह कितीही धरला तरी तो अतिरेक होत नाही. उलट असत्याचा आग्रह फालतू गोष्टींसाठी धरला तरी तो अतिरेक होतो. अतिरेक म्हणजे मर्यादोल्लंघन होय.

Monday, 28 May 2012

पुस्तक परिचय - विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म


                             


 

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

लेखक – प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक – 9902002585
वेदान्त विवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-.
हे पुस्तक पुर्वी विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळे असले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञान म्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतः सत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीत असूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष रीतीने का होईना) होते, म्हणून भौतिक जगाचा वैज्ञानिक अभ्यास (भौतिक संशोधन) हा अध्यात्मिक सत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे असे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे या पुस्तकातून प्रतिपादन आहे. त्यांचे सर्व लेख अशा संगतवारीने आहेत की ते पुस्तकाच्या शीर्षकाला न्याय देतात.
या सुसंगत संकलनात लेखकाचा अप्रतिहत सर्वांगिण व्यासंग व भाषेवरील प्रभूत्व, सुक्ष्म व सखोल चिंतन थक्क करणारे आहे. विशिष्ट हेतू मनांत ठेऊन लेखन करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांना गीतेसारख्या ग्रंथांचे विकृतीकरण केल्याशिवाय स्ववैशिष्ठ्यवादी म्हणून सन्मान मिळत नाही. अशांचा खरपुस समाचार लेखकाने घेतला आहे.
चार्वाकवादावर लेखन करताना ते म्हणतात, चार्वाकांच्या प्रत्यक्ष प्रामाणवादचे तत्व (जेथे धूर आहे तेथे अग्नी आहे हे अनुमानाने सिद्ध होत नाही. अग्नीचे अस्तित्व केवळ प्रत्यक्षाने सिद्ध होते.) स्वीकारणे विज्ञानाला अशक्य आहे. कारण विज्ञानाचा जन्मच अनुमानातून झाला आहे. तर चार्वाक त्या अनुमानालाच ठोकरून देतात.
चार्वाकांचा देहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतील यंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेक उदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्या कसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठी जगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी, विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय? शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे काय? असा प्रश्न करून निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.
प्रकरण 2 मधे  प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी प्रामाण्यवादाच्या पुरस्कर्त्यांना इशारा दिला आहे. सत्य जाणण्याचे अंतिम प्रमाण भौतिक नसून आत्मिक (अनुभाविक) आहे. त्यासाठी भौतिक प्रमाणवाद टाकून अनुभवप्रमाणवादी बनणे आवश्यक आहे. नेमके तेच कथन क्वांटम सिद्धांतात परस्पर विरोध (पॅरॉडॉक्सिकल) रुपाने, तर अध्यात्मशास्त्रात सदसद्विलक्षण रुपाने सांगितला जातो असे ते म्हणतात.
प्रकरण 3 मधे जीवोत्पत्ती हे रुढ जीवशास्त्राला न सुटलेले कोडे यात ते म्हणतात, जीव हा तुकड्यांनी बनलेला नाही तर माहितीने बनला आहे. योगायोगाने नव्हे तर नियमानुसार निर्माण झाला आहे. अपघाताने नव्हे तर स्वाभाविकपणे बनला आहे असे संगणकयंत्राने गणितीय नियमांनी दाखवून दिले आहे. मात्र अडचणीची समस्या सोडवण्यासाठी काही शास्त्रज्ञ ती समस्या टाळण्याचा किंवा नसल्याचा प्रयत्न करताना दिसतात. तो कसा खोटा आहे हे लेखकाने सप्रमाण दाखवून दिले आहे.
प्रकरण 4 प्लँचेट या रंगतदार विषयाला वाहिलेले आहे. त्याचे नियम, विलक्षण अनुभव, पाश्चात्यांनी त्यावर केलेले प्रयोग सर्व माहिती नवी आहे. प्लँचेट करून मिळणारी उत्तरे कोण देतो? यावर त्यांचे मत मोलाचे आहे. ते म्हणतात की मानवी मनाच्या अतींद्रिय शक्तीचे ते रुप आहे.
प्रकरण 5 ज्योतिषशास्त्रातील ग्रह मानवावर प्रभाव पाडतात काय? यावर प्रश्नावर आधारित आहे. त्यांना तो प्रभाव हा एका व्यवस्थेचा भाग म्हणून मान्य आहे. त्यात नाडी ग्रंथांवर भाष्य करताना ते म्हणतात. फलज्योतिष हे कुंडलीवरून वर्तवलेले भविष्य असते. याच्या उलट नाडीग्रंथ भविष्य हे कुंडलीचेच भविष्य असते. म्हणजेच एखाद्या व्यक्तिचे भविष्य वर्तवण्य़ासाठी तिच्या कुंडलीची आवश्यकता नाडीग्रंथाला मुळीच नाही, कारण तिच्या कुंडलीचे भविष्यच नाडीग्रंथ वर्तवतात. त्यांनी यावरून असा निश्कर्ष काढला आहे की कुंडली किंवा ग्रह व त्या ग्रहस्थितीप्रमाणे जन्म घेणारी व्यक्ती म्हणजेच मानवी जीवन व ग्रहांची भ्रमणे ही दोन्ही एकाच व्यवस्थेने निश्चित होत असतात. म्हणजेच ती एकाच व्यवस्थेचे अंग असतात व मानवावर ग्रहा-नक्षत्रांचा परिणाम होतो काय? ही जटिल समस्या जटिल तर नाहीच पण समस्याही राहात नाही.
प्रकरण 6 संतसाहित्यातून अंधश्रद्धा निर्मूलन कसे केले आहे? यावर प्रकाश पाडणारे आहे. मात्र संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्यावहारिक पातळीवरील असून ते बेगडी, तोंडदेखले व निरीश्वरवादी लोकांनी ठरवलेल्या साच्याचे नाही. असे त्यांनी विविध संतवचनांची वचने देऊन ठासून सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. नी.र. वऱ्हाडपांडे निर्मित संताच्या चमत्कारवादातील भ्रामक कथनातून त्यांनी वाचकांची दुहेरी वैचारिक फसवणूक कशी केली आहे याची चिरफाड केली आहे. संतांची इच्छा असेल तेंव्हा संतांना चमत्कार करता येतात हे डॉ. वऱ्हाडपांड्यांचे कथन खोटे आहे. हे प्राचार्य अद्वयानंद गळतगे त्यांनी, संतांच्या जीवनात चमत्कार आपोआप घडतात. ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून नाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलविले ते संत म्हणून नाही तर योगी म्हणून आणि योग हे भौतिक शास्त्राप्रमाणेच एक काटेकोर शास्त्र आहे’, असे प्रतिपादन केले आहे.  
प्रकरणे 7 ते 10 मधून प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीं काही विवेकवादी लेखकांनी भगवद्गीतेतील कथनांना समस्या ठरवून वाद उकरण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर आधारित आहेत. त्यातील प्रकरण 7 मधे ज्ञानेश्वरीतील विश्वोपत्तीच्या निरुपणावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी वैज्ञानिक दृष्ट्या प्रकाश टाकला आहे. तर प्रकरण 8 मधे गीतेतील नवव्या अध्यायासंदर्भात ज्ञानेश्वरांनी (काहीही) न करता भजन जाहले म्हटले आहे, त्याचा मतितार्थ कसा लावावा किंवा कसा लावू नये? याचा वस्तुपाठ आहे. ते म्हणतात, प्रत्येक कर्म परमेश्वराप्रित्यर्थच आहे हे जो जाणतो किंवा असे जाणून प्रत्येक कर्म करतो तो परमेश्वराचे भजनच करतो. कारण त्याच्या त्या जाणण्यामुळे ते कर्म परमेश्वरालाच पोहोचते. पण हे जो जाणत नाही त्या अज्ञानी मुर्खाच्या हातून हे परमेश्वराचे सहज (न करता) होणारे भजन घडत नाही.
प्रकरण 9 मधे गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, गीता नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे काय?, आत्मा हा डब्यातील लाडवा प्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?, गीता कथनाला युद्धभूमि  योग्य किंवा अयोग्य?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा? आदि प्रश्नांची उकल करून त्यातील वैचारिक फोलपणा उकलून दाखवला आहे. प्रकरण 10 मधे गीतेचे अधिकारी कोण? असा नेहमी विचारला जाणारा प्रश्न उत्पन्न केला आहे. त्यावर समर्पक उत्तर देताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा दृष्टांत देताना म्हणतात, तैसे अध्यात्मशास्त्री इये। एक अंतरंगचि अधिकारिये। येर वाक् चातुर्ये। होईल सुखिया।। म्हणजे एक अंतरंगी व्यक्तीच गीतेची अधिकारी आहे. बाकीचे (येर) बहिरंग गोष्टींमुळे सुखी होतात. ते कसे? तर-  वधूची आई वरात श्रीमंती पहाते, बाप वरात शिक्षण पहातो, भाऊबंद वरात जात पहातात, इतर लोक वराचे मिष्टान्न पाहून खुष होततात. असा रीतीने इतर लोक अवांतर गोष्टीं पसंत करतात. एकटी वधूच वराला वर म्हणून निवडते, पसंत करते. म्हणजेच जन्माचा सोबती म्हणून निवडते. म्हणून तिचा एकटीचाच वरावर अधिकार चालतो. इतर कुणाचाच नाही. गीतेच्या अधिकारी व्यक्तिबद्दलही तसेच आहे. कारण त्याला गीता ही जन्माची सोबती (जीवनाचार) म्हणून निवडाची असते.
प्रकरण 11 हे या पुस्तकाचा मुकुटमणी आहे. अष्टावक्र गीता अर्थात कैवल अदैत वेदांत - म्हणजे काय?’ राजा जनकाला आठ ठिकाणी वाकलेल्या योग्याने केलेला उपदेश व श्री कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश यातील तुलना,  केवल वेदांतातील दृष्टीसृष्टीवाद तो काय? मुक्त पुरुष जगात कसा वावरतो? दृष्य़ जग व देह हे खोटे कसे ? यावरील त्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले विवेचन रंजक आहे. अनेक उपनिषदांचे, संतांचे व पाश्चात्य विचारकांचे संदर्भ देण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या लेखनातून प्राचार्य अद्वयानंद गळतगे हे ज्ञानी व्यक्तिमत्व स्वानुभवविश्वाचे माणिक-मौत्तिकांचे आगर आहेत असे जाणवते.