Saturday 2 June 2012

 अंधश्रद्धानिर्मूलनवाद्यांची एक फसवी भलावण 
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 5
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 5

लोणावळ्याच्या र्स्ट व्हू वे तर्फे प्रसिद्ध झालेल्या 1989 च्या मनशक्तीच्या दिवाळी अंकातील अंधश्रद्धा निर्मूलनातील गूण आणि धोके या लेखामुळे प्रस्तूत लेखकाला अनिच्छेने या संबंधी पुन्हा थोडे लिहावे लागत आहे. (असा लेख दुसरा कोणी लिहिला असता तर त्याची त्याने दखल घेतली नसती. पण ज्याने एके काळी अंधश्रद्धा निर्मूलन वाद्यांचा खोटारडेपणा जाहीरपणे वेशीवर टांगला होता, त्या रेस्ट व्हू वे ने (लेख कोणी लिहिला हे  नमूद नसल्याने असा उल्लेख केला. तथापि काही काळाने हा लेख स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिला आहे आणि आपले (गळतगे यांचे) लेखन ते आगत्याने वाचत असतात. असे मनशक्तीच्या विश्वस्तांकडून कळवण्यात आले) असा लेख लिहावा हे त्याला खटकले. म्हणून हा लेखन प्रपंच करावा लागत आहे )
उपर्युक्त अंकात अंनि वाद्यांमधे चार गूण असल्याचे म्हटले आहे. त्यात पान 277 वर पुढील विधाने केलेली आहेत.  अंधश्रद्धेविरुद्ध लढाई लढताना त्यातील काही जण *अतिरेक करत असतील... टोकाची भूमिका घेत असतील. प्रसंगी त्या सोसून ही त्यांना साथ दिली पाहिजे. चांगल्या गोष्टींमधे आव्हानापेक्षा  आवाहनाची गरज आहे. ...
.... या बाबत प्रश्न असा, की आव्हानापेक्षा आवाहनाची गरज आहे, या सल्याची वास्तविक गरज कोणाला आहे? आव्हाने कोण देतो असतात? ... पण सर्वात महत्वाचा प्रश्न असा उद्भवतो की अंधश्रद्धा निर्मूलन हे समाजकार्य असताना त्याचा अतिरेक कसा संभवतो? ('समाजकार्याचा अतिरेक' ही कल्पनाच करता येत नाही) उपर्युक्त लेखात या गोष्टींची चर्चा न करता इतर बरेच काही लिहिलेले आहे. मुख्य प्रश्न असा आहे , की ज्या विज्ञानच्या नावाखाली ही चळवळ सुरू आहे त्या विज्ञानाची दृष्टी ही चळवळ करणाऱ्या लोकात आहे काय? खरे तरवैज्ञानिक दृष्टी असेल तर अतिरेकाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आणि वादही निर्माण होत नाही. विज्ञानाच्या नावाखाली टोकाची भूमिकाच घेणे शक्य नाही. विज्ञानाच्या कसोट्या सार्वजनिक, वस्तुनिष्ठ, आणि वादातीत असतात. त्या ठिकाणी अतिरेक आणि टोकाची भूमिका संभवतच नाही. अतिरेक होतो तो अवैज्ञानिक दृष्टीकोन बाळगल्यामुळे (फालतू गोष्टींचा विचार केल्यामुळे) होय. आणि अंनिवाद्यांकडून अतिरेक होतो याचे कारण अंनिवाद्यांत वैज्ञानिकतेचा अभाव आहे, हेच आहे. म्हणून प्रस्तूत लेखकाचा प्रश्न आहे की, अं.श्र. नि वाद्यांच्या (या अवैज्ञानिक दृष्टीकोनामुळे निर्माण झालेल्या ) अतिरेकाचे उपर्युक्त लेखक कसे समर्थन करतो आणि त्यांना साथ देण्याचा इतरांना कसा सल्ला देतो? खालील उल्लेखांवर इथे वाचा

  • मार्टीन गार्डनरच्या पुस्तकाचा हवाला
  • गार्डनरच्या बहुचर्चित मनाच्या मोकळेपणाच्या विधानाचा खरा अर्थ
  • गार्डनर यांना आपण बुद्धिवादी पुर्वग्रह(RATIONAL PREJUDICE)पाळत असल्याचे कबूल

* अतिरेक याचा अर्थ 'एखाद्या  गोष्टीचा अती आग्रह धरणे' असा होत असता तरी सत्याचा आग्रह कितीही धरला तरी तो अतिरेक होत नाही. उलट असत्याचा आग्रह फालतू गोष्टींसाठी धरला तरी तो अतिरेक होतो. अतिरेक म्हणजे मर्यादोल्लंघन होय.

No comments:

Post a Comment