Wednesday 22 February 2012

हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती - प्रकरण 4


हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती

विज्ञाऩ आणि अंधश्रद्धा निर्मुलन  प्रकरण 4 

14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै. तरुण भारतमधे बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायब – अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली. अशी एखादी बातमी प्रसिद्ध होताच प्रस्तूत लेखक (प्राचार्य अद्वयानंद गळतगे) ताबडतोब तेथे हजर होतो. त्याप्रमाणे तो तेथे म्हणजे बेडकीहाळ, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव येथे – गेला. नंतर ज्या मुलीच्या अंगावरील कपडे गायब होत होते, त्या मुलीच्या आईच्या सासऱी हे प्रकार मुळात सुरू झाल्याचे कळल्यामुळे तो तेथे ही म्हणजे हेरवाड, तालुका शिरोळ, जि. कोल्हापुर या गावीही गेला. तेथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक इचलकरंजीच्या दै. मँचेस्टरमधे अशीच बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे आलेले आढळले. या संबंधित घराचा भानामती पीडित तरूण (जो इचलकरंजी येथील सुत गिरणीत काम करतो) श्री. मल्लप्पा बसप्पा नेर्ले याने इचलकरंजीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका प्रमुख व प्रसिद्ध कार्यकर्त्यास आपल्या घरातील दीर्घकाळ चालू असलेल्या भानामतीचा बंदोबस्त करावा अशी लेखी विनंती करून देखील...
... त्या वेळचे लेखी विनंती पत्र 
रजिस्टर ए.डी.
नाव - मल्लाप्पा बसाप्पा नेर्ले हेरवाड ( ता. शिरोळ, जि. कोल्हापुर)
प्राश्री. विजयकुमार ईश्वर शिंदे
कोल्हापुर जिल्हा संघटक अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
स.न.वि.वि.
आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे माझ्या घरी येण्याचे कष्ट घेऊन माझा भानामतीचा त्रास नाहीसा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरून मी आपला अतिशय आभारी आहे. आपण व आपल्या समितीच्या लोकांनी अनेकदा हा त्रास येथून पुढे होणार नाही असे घरी येऊन सांगितले आहे, तरी त्रास चालूच आहे. मांत्रिक सुद्धा असेच सांगतात. मग मांत्रिकात व तुमच्यात काय फरक? मांत्रिक हा प्रकार माणसाचा नव्हे असे म्हणतात. आपण हे सारे माणसामुळेच होते असे म्हणता. माणसांमुळे होत असेल तर कोणता माणूस हे करत आहे हे आपण सांगितले पाहिजे. माझ्याकडून आपण मांत्रिकाकडे जाणार नाही असे लेखी वचन लिहून घेतले आहे. माझ्यावर हे बंधन घातल्यामुळे कोणा मांत्रिकाकडे मी जाऊ शकत नाही. मग हे प्रकार बंद होण्यासाठी कोण माणूस हे करीत आहे हे कळावयास नको काय? हे सांगण्याचे आपणावरही बंधन आहे. कारण आपण माझ्याकडून लेखी लिहून घेऊन माझ्यावर बंधन घातले आहे. समजा, हे प्रकार बंद झाले तरी ते कोण करीत होते व का करीत होते हे समजावयास नको काय? इतकेच नव्हे तो ते कसे काय करीत होता हेही कळावयास पाहिजे. तरच तो माणूस ते करत होता असे म्हणता येईल आणि हे आपणांस मला पटवून द्यावे लागेल. ते सुद्धा लेखी सविस्तर पटवून द्यावे लागेल. कारण त्यामुळे भानामतीचा त्रास होणाऱ्या इतर अनेक लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ते सावध होतील. शिवाय माझ्याकडून जसे तुम्ही लेखी घेतले आहे तसे तुम्हालाही मला लेखी लिहून द्यावे लागेल म्हणून मी हे पत्र मुद्दाम लिहिले आहे. तुमचे ही आमच्या घरच्या भानामतीचा उलगडा करणारे सविस्तर पत्र मला आले पाहिजे. किंवा प्रत्यक्ष मला या प्रकारावर प्रकाश टाकणारे लेखी सविस्तर निवेदन माझ्या हातात दिले पाहिजे. असे तुम्हा काही केले नाही तर तुमच्यात आणि मांत्रिकात काही फरक नाही असे समजेन व मी तुम्हाला दिलेल्या वचनातून मुक्त झालो आहे असे समजेन व तुम्हीही असे समजावे.
कळावे.
आपला (म. ब. नेर्ले.)
ता. क. भानामतीच विवेचन केल्यास आमच्या घरचे वातावरण बिघडेल असे आपणास वाटत असल्यास मी तसे काही होणार नाही याची हमी देतो. शेवटी याची जबाबदारी आमची राहील. तुम्हाला याबद्दल जबाबदार धरले जाणार नाही.
आपला (म. ब. नेर्ले.)
यासंदर्भात  प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी 19 सप्टेंबर 1993 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना पत्र पाठवून त्यांनी संबंधितांच्या प्रत्यक्ष भेटीतून मिळवलेल्या घटनांचे उल्लेख असलेले 31 बिंदूंचे सविस्तर पत्र रजि. पोस्टाने पाठवले ते न स्वीकारता परत आले.
त्यात 31 मुद्यांनंतर समितीला उद्देशून 12 मुद्दे लिहिले होते. त्यातील 12 क्रमांकामधे ते म्हणतात,  भानामती आमच्यासमोर का घडत नाही, ती घडत नसल्यामुळे ती खोटी असे आपल्या समितीचे म्हणणे आहे. हा समितीचा प्रश्न, काल संध्याकाळी दवाचे थेंब गवताच्या पानांवर नव्हते, ते सकाळी कुठून आले? (माझ्या समक्ष का आले नाहीत ?)असे आईला विचारणाऱ्या बालकवींच्या बाळ्याच्या प्रश्नाप्रमाणे बालिश आहे. विज्ञानवृत्तीच्या माणसाला न शोभणारा आहे. तू समोर का घडत नाहीस?’ असे त्या भानामतीला विचार, असे यावर समितीला याच पद्धतीने मल्लाप्पाला उत्तर देता येईल. दुसऱ्या शब्दात ती समोर का घडत नाही हे समितीने शोधून काढले पाहिजे.
निसर्गातील सर्वच घटना समोर घडत नाहीत. अनेक घटना त्या घडून गेल्यानंतरच, त्याची त्याची लक्षणे शरीरात दिसल्यानंतरच कळतात. तो रोग होण्यापुर्वी ते कसे होतात हे कळत नसेल तर ते शोधून काढणे हे जसे वैद्यकशास्त्राचे काम आहे, तसे भानामती ही सुद्धा रोगाप्रमाणे निसर्गातील एक विकृती आहे, असे मानून त्याची कारण परंपरा शोधणे हे विज्ञानवृत्ती बाळगणाऱ्यांचे कर्तव्य आहे. ती बुवाबाजीप्रमाणे कोणत्या तरी स्वार्थी हेतूने केली जात असली पाहिजे हे उघ़ड आहे. तो स्वार्थी हेतू शोधून काढून तो समितीने उघड करून दाखवला पाहिजे. तसे काही न करता कसलाही आधार नसताना मल्लाप्पावर आरोप करणे व पुरावा नसताना विमलच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, म्हणजे प्रतिपक्षाच्या लोकांवर राजकीय हेतूने खोटेनाटे आरोप करणाऱ्या राजकारणी लोकांची खेळी खेळणे होय. म्हणून माझा समितीला शेवटचा प्रश्न आहे की एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होऊ पर्यंत ती निष्पाप आहे असे गृहीत धरण्याची शास्त्रीय व न्याय्य पद्धत धाब्यावर बसवून ती गुन्हेगार असल्याचे अगोदरच गृहीत घरणे, त्यासाठी मारझोड चरित्रहननाचा मार्ग अवलंबणे, आपल्याला हवे ते वदवून घेण्यासाठी खोटेपणा करणे या समितीच्या कार्यपद्धतीवरून समितीचा मूळ हेतू वैज्ञानिक संशोधन करणे हा नसून विशिष्ट राजकीय (नास्तिक आणि धर्मविरोधी) विचार प्रणालीचा राजकीय पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याचा आहे असे का मानू नये?...
       वरील पत्र लिहिल्यानंतर घडलेल्या काही घटना –
·        मल्लाप्पाच्या वडिलांचा हॉस्पिटलात अचानक मृत्यू. वडिलांची बळी घेऊन भानामती गेली असा मल्लाप्पाचा समज झाला. पण दोन महिन्यानंतर हा समज चुकीचा ठरवणाऱ्या अनेक घटना सुरू झाल्या.
अशी ही हेरवाडची एकाच कुटूंबातील सातआठ वर्षे त्याना याना त्या स्वरुपात सतत भंडावणारी भानामती! बातमीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हे आव्हान आहे, असे म्हटल्यामुळे जिची समितीच्या लोकांना इच्छेविरुद्ध दखल घ्यावी लागली व जिच्यापुढे त्यांना नाक घासावे लागले. अशी ही भानामती! असे म्हणावयाचे कारण 15 सप्टेंबर 1993 रोजी, अंनिसचे दोन लोक मल्लाप्पाच्या घरी आले व ती बंद होत नसल्याचे कळल्यामुळे ही भानामती आम्हाला कळत नाही. येथून पुढे आम्ही येणार नाही असे म्हणाले आणि यांनी हा शब्द अक्षरशः पाळला!
हेरवाडच्या भानामतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीची केलेली फजिती पाहून कुणी असा ग्रह करून घेईल की येथून पुढे तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती भानमती हे अतिप्राकृतिक सत्य आहे, हे मान्य करील. पण सत्य आणि अंनिस हे एकत्र कधीच नांदत नाहीत. थोड्याच दिवसात सांगलीत लोकांची एक बैठक झाली ती मधे या लोकांनी चक्क जाहीर केले की हेरवाडची भानामती खोटी असून तो प्रकार घरची मुख्य व्यक्ती विमल हीच करते! याला पुरावा काय? विचारू नका! आधार काय? विचारू नका! समितीच्याच लोकांनी मल्लाप्पाच्या घरी येऊन लोटांगण घातले होते. या वस्तुस्थितीचे काय? विचारू नका! असले प्रश्न उपस्थित करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे! अंधश्रद्धा नाही ती सत्यशोधक समितीच्या लोकांकडेच!
हे संपुर्ण प्रकरण इथे वाचा.  

No comments:

Post a Comment