Wednesday 1 February 2012

चित्रपट निर्माते गजानन जागीरदर यांच्यावर बुद्धिवाद्यांनी केलेला अन्याय - प्रकरण 9

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9


 लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात?
कोणतेही मत अनुभव आल्याशिवाय कोणी बनवत नाही. रुढ विज्ञानाच्या नियमात न बसणाऱ्या घटनांचा अनुभव आल्याशिवाय त्या घटना शक्य असल्याचे मत कोणी नोंदविणार नाही. निदान असे अनुभव आलेल्या जवळच्या व्यक्तिंचा परिचय तरी त्यांना असला पाहिजे असे अनुभव आलेल्या व्यक्तिंची संख्या प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे. असे अनुभव आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने असतील तर आपला अनुभव जाहीर करणाऱ्यांची संख्या ही मोठी असावयास पाहिजे. पण ती तशी दिसत नाही. यावर कोणी प्रश्न विचारील. त्याला उत्तर – ‘तशी संधी त्यांना मिळत नाहीहेच आहे. खाजगीत ते आपला अनुभव सांगत असतातच. तसा प्रसंग उद्भवला तर आपला अनुभव जाहीरपणे सांगायला मागे पुढे पहात नाहीत, असे आढळून आले आहे. त्याचे एक अलिकडील घडलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे भूतपुर्व सभापती व प्रसिद्ध विचारवंत दिवंगत वि. स. पागे  यांनी आपल्याला आलेल्या एका चमत्काराच्या अनुभवाचे एका जाहीर सभेत केलेले कथन होय.
अशाच प्रकारच्या एका चमत्कारचा अनुभव प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक गजानन जागीरदार यांना आपल्या जीवनात आला. आणि तो त्यांनी आपल्या पाऊलखुणाया आत्मचरित्रात कथनाच्या ओघात सांगितला. त्याची चैतन्य देशमुख नावाच्या लेखकाने कोल्हापुरच्या पुढारी दैनिकातून मरता क्या नहीं करताया मथळ्याच्या लेखाने जाहीर वाच्यता केली. संपादकांनी या लेखावर वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. मात्र त्या मागवताना आपण या घटनेकडे बुद्धिवादी दृष्टीकोनातून पहात असून वाचकांनी ही तसेच पाहावे असे आवाहन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून या घटनेची विज्ञानवादी उकल करणारा लेख मुद्दाम लिहून घेऊन प्रसिद्ध केला. दाभोळकरांचा तो लेख म्हणजे विज्ञानाच्या रुढ नियमांच्या चौकटीत ही घटना ओढूनताणून बसविण्याचा एक आडदांड प्रयत्न असून तो लिहून व प्रसिद्ध करून अनुक्रमे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पुढारीचे संपादक यांनी गजानन जागीरदारांवर घोर अन्य केला आहे. तो कसा केला आहे, हेच तेथे त्या लेखाची शास्त्रीय निकषांच्या आधारे छाननी करून दाखवून द्यायचे आहे.
त्या प्रकरणातील महत्वाच्या बाबी:-
             पाऊलखुणा आत्मचरित्रातील संबंधित भाग पुर्ण उद्घृत करीत आहे.
             जागीरदारंची एका चमत्काराची पाऊलखूण
             मंत्रातंत्रावर विश्वास ठेवायचा का?
             ‘अंधश्रद्धा विनाशायपुस्तकातील प्रकरणातील उल्लेख
             या घटनेतील मुख्य प्रसंग
             दाभोळकरांच्या हवेतील वावड्या
             जागीरदारांनी परमेश्वराचे आभार का मानले?
             संभवनयती सिद्धाताविषय़ीचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे घोर अज्ञान
             डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे संमोहन-प्रक्रिये विषयीचे अज्ञान व मिथ्याकथन
             जेंव्हा सर्व युक्तिवाद संपतात
             आमचेही एक लाख रुपयांचे आव्हान आहे, स्वीकारा!
             हे घ्या पं. शर्मांच्या बाजूने पुरावे.
             खुर्चीच्या चमत्कारासारखा आणखी एक चमत्कार
             वाचकांच्या प्रतिक्रिया

हे प्रकरण इथे वाचा

1 comment:

  1. मित्र हो,
    अनेक वाचक प्रा. गळतग्यांचे लेखन वाचतात. मात्र त्यांच्या कथनांवर, विचारांवर साधक बाधक प्रतिक्रिया - विचार - व्यक्त करताना दिसत नाहीत.
    प्रत्येकाला त्यांचे म्हणणे मान्य व्हावे असे नाही. पण निदान ज्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला पाठिंबा आहे त्यांनी त्यांचे मुखिया, विचारक काय व कसे दिशाभूल करणारे विचार पसरवतात याचे हे प्रकरण जळजळीत उदाहरण आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जरूर विचार व आत्मशोध करावा अशी विनंती.

    ReplyDelete