Monday, 28 May 2012
Sunday, 11 March 2012
‘भानामती’ नावाचे काही घडत नसते, ती कशी नाही वा असू शकत नाही असे श्री. गुली नामक व्यक्तीचे मत
उदय व अन्य मित्र हो
( मायबोली, मिसळपाव, मी मराठी नामक संस्थळावर प्रा. गळतगे यांच्या वि आणि अंनि मधील भूमिका या धाग्यावर चर्चा रंगली आहे. त्यातील काही लोकांनी भानामती वगैरे काही नसते असा विचार मांडला आहे त्यासंदर्भात तील हे लेखन )
टीओआय मधील लिंक वाचली. बातमी नेहमी कमी शब्दात व संपादून छापलेली असते. असे माझे मत आहे.म्हणून ती खोटी असे मी म्हणत नाही पण त्यातील सर्व विधाने सरसकट घेऊ नयेत असे मला वाटते.असो.
खालील एक ऑल अबाऊट बानामती - डेक्कन हेरॉल्ड मधील रिपोर्टची लिंक पुर्वी वाचनात आलीहोती.
त्यातील खालील उतारा ‘भानामती’ नावाचे काही घडत नसते, ती कशी नाही वा असू शकत नाही असे श्री. गुली नामक व्यक्तीने कर्नाटक सरकारच्या भानामतीच्या शास्त्रीय शोधाबद्दलच्या समितीतील एक सहकारी म्हणून शिवम्मा व अन्य लोकांची शारीरिक तपासणी करून सिद्ध केलेले आहे. म्हणून त्याला प्रत्यावाद नसावा.
त्यात ते म्हणतात,
“Towards this, Shivamma had called the girl to her house on April 15, and had applied chemicals on her body, and dress. This was probably some pyrogalic compound like lithium, which catches fire as soon as it comes in contact with water, Mr Guli said. Shivamma claimed before the villagers that this was through her powers of bhanamati. The girl’s elder sister, who is married, also caught fire in the same fashion a few days later, but she survived, he adds.
The examination of the dresses worn by both the victims showed traces of the chemicals used, he said. Moreover, Mr Guli points out that bhanamati cannot be practiced by a single person, as the main practitioner may claim. This has to be done by a group of people. While the main practitioner claims that he will do bhanamati on some person, his accomplices do all the physical work of applying chemicals to the victims as the case may be. They make a targeted cow drink certain chemicals which causes internal ruptures because of which it begins to yield blood instead of milk.”
ते म्हणतात, ‘probably’ (नक्की काय ते त्यांना माहित नाही पण) भानामती असल्याचे भासवणारे लोक ती 'काही काही रसायनांचा' वेळोवेळी उपयोग करून व काही लोकांना हाताशी धरून अशी परिस्थिती तयार करतात की त्यामुळे भानामती झाल्याचा आभास निर्माण होतो. हे स्पष्टीकरण ‘सत्य व नक्की पडताळा करून ठरवलेले आहे’ असे मानावे असा विज्ञानवाद्यांचा आग्रह असणार नव्हे असतो. असे हातचलाखीचे वा रसायनिक पदार्थांचे वापर करून जादुई प्रयोग करणारे अनेक आहेत.
आता वरील कथनावर वाचकाने असा विचार करावा - मीच शिवम्मा आहे. कर्नाटकातील एका खेड्यात राहाते -तो. मला एकावर मुलीवर-बाईवर आणि काही गाईंवर भानामतीचा प्रयोग करायला एकाने वैयक्तिक वितुष्टामुळे पैसे देऊन तयार केले आहे.
आता मला श्री. गुली म्हणतात तसे 'पायरोगॅलिक मिश्रणासारखे लिथियम' नावाचे रसायन अचानक आग लावायसाठी मिळवायला हवे. लिथियमला सामान्य कानडीभाषेत काय म्हणतात, ते मला घरगुती तयार करता येत नसेल तर कुठल्या किराण्याच्या वा केमिस्टच्या दुकानात मिळते, केवढ्याला व किती प्रमाणात याचा विचार करायला हवा. समजा पैशाची, रसायनाची तयारी मी केली. आता मला ते हव्या त्या व्यक्तिच्या शरीराला लावायला मिळण्यासाठी योग्य संधी हवी. ती मुलगी जी नंतर मेली, आपणहून हे सर्व करायच्या आधी शिवम्माकडे का व कशी गेली. नंतर आग लागेपर्यंत घरच्यांना काही कशी बोलली नाही. बर ती गेली तर गेली, तिची विवाहित बहिण ही नंतर काही दिवसांनी शिवाम्माकडे गुपचुप गेली पण कर्मधर्मसंयोगाने ती आगीतून वाचली...असो.
जे लोक अशी कामे हातात घेतात त्यांचे आधीच्या केसेस हाताळून पैशाने खिसे भरलेले असले पाहिजेत. आता श्री गुली म्हणतात की सत्यसोधक समितीला उत्तरे देतानाशिवम्मा सर्व गावकऱ्यांसमक्ष, मी एकटीच भानामतीच्या शक्तीने हे साध्य करते असे जरी म्हणाली असली तरी तिचे ते म्हणणे डावलून, अन्य मदतीच्या कामासाठी माणसे मिळवायला सोय करावी लागते.
अशी ती शिवम्मा एक तर खुप पैकावाली व माणसे राखलेली असावी लागेल, शिवाय असा धंदा इतका सोपा व पैसे देणारा असेल तर तिचे सहकारी तिला मागे टाकून तेच या धंद्यात प्रतिस्पर्धी होतील. पण शिवाम्मा किंवा असे मांत्रिकाचे काम करणारे लोक खोपटात नगण्य परिस्थितीत जगत असतात आणि त्यांना अशी कंत्राटे देणारा ही असाच खेड्यातील जनसामान्य असतो असे समितीच्या लक्षात आले असेल.
'ए इकडे ये ग. हे चॉकलेट खा. मी तुला रसायन लावायला आली आहे' असे इतक्या सहजासहजी जे शक्य होणार नाही. पण पैसे देणाऱ्या व्यक्तिने तगादा लावला आहे की अजून कसे आग लावायचे भानामतीचे चाळे सुरू करत नाहीस. म्हणून शेवटी साहस करून त्या व्यक्तीला घरी आणून तिच्या शरीरातील व कपड्यांना ते रसायन फासायला मला नेलेच पाहिजे. तिकडे त्या गोठ्यात बांधलेल्या गाई कोठल्यातरी रसायने (certain chemicals - ज्याचे नाव शोधायचे काम समितीने आपणहून अंगावर घेतला होते तरीही ती अशास्त्रीय ढोबळ शब्द रचना करते) मिश्रित चारा खात नाहीत व पाणी पीत नाहीयेत. साधे त्यांच्या जरा जवळ गेले तर जनावरं अनोळख्याला ढुशा मारतात. रात्री जावे असा हाताशी घरलेल्या लोकांतर्फे घाट घातला तर आसपासच्या जनावरात हालचाल होते व घरातले लोक जागे होतात. पकडले जाऊ म्हणून मग परतावे लागते. अशी कैफियत वाचक म्हणून शिवम्मा असाल तर आपल्याला करावी लागली तर नवल नाही. पण समितीला त्याची फिकिर नाही.
श्री. गुलींनी असा सर्व शास्त्रीय विचार करून त्या शिवाम्माला असे विचारले असेल की मला माहित नाही असे 'सर्टन केमिकल' ते कुठले? की ज्यामुळे ते गाईंच्या पोटात गेले तर त्यांच्या आचळातून दुधाऐवजी रक्त पडेल? बर त्यांनी नाही विचारले, असे मानले तर डॉ. नरसिहय्यांच्या अध्यक्षतेखाली भानामती विरोधात मुद्दाम संघटित केलेल्या समितीने आपल्या कर्नाटक राज्याच्या सरकारी अहवालात तरी त्या कमिकल्सचे उल्लेख केले असले पाहिजेत आणि कर्नाटक सरकारच्या व सामान्य जनतेच्या समाधानाकरिता असे प्रात्यक्षिक त्यांनी सार्वजनिक ठिकाणीकरून दाखवले पाहिजे.
महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे वारे वहाते असून भानामती या प्रश्नावर विचार करून उपाययोजना करणारे ही आहेत. त्यांपैकी एका उपाययोजक निष्णातांनी पिवळा फॉस्फरस अचानक आग लावायला भानामतीचे खेळ करणारे व्यक्ती वापरत असावेत असा 'अंदाज' व्यक्त केला आहे. त्यावर भानामतीचा बंदोबस्त करणारे दुसरे निष्णात व्यक्ति म्हणतात की असले पोरकट तर्क वापरल्याने भानामती करणारी व्यक्ती मनोमन हसली असेल.
अशी खिल्ली उडवताना म्हणतात, 'अहो, श्री. निष्णात, बाजारात सहज उपलब्ध असणारे 'पदार्थ(?)' भानामती करणारे वापरतात. फॉस्फरससारखे सहजासहजी विकत न मिळणारे पदार्थ त्यांना उपलब्ध कसे व केवढ्याला पडतील याची कल्पना करा'. आता हे दुसरे श्री. निष्णात देखील भानामती करणाऱ्या व्यक्तीला बाजारात सहजासहजी विकत मिळणारी व अचानक पेट घेणारी वस्तू कोणती ते मात्र चुकून सांगत नाहीत...
माझा या लेखनातून फक्त शोध कार्य करणारे किती थातुर मातुर शब्दात शास्त्रीय विश्लेषणाची विल्हेवाट लावतात. जरा खोलवर विचार केला तर त्यातील त्रुटी लक्षात याव्यात असा आहे. डॉ. साती म्हणतात तसा कोणी कांगावा करून आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला लोक आले असतील. हे मान्य पण सरसकट असे माप लावू नका. शोध घ्या व मग ठरवा.

Thursday, 1 March 2012
वाचकांचा भरघोस प्रतिसाद स्क्राईब डी वरील वाचकांच्या संख्येवरून दिसून येतो.
मित्र हो.
स्क्राईब डी वरील लिंकवरून वाचकांच्या संख्येतून प्रा.गळतगेयांचे विचारांवर वाचकांचा भरघोस प्रतिसाद दिसून येतो. प्रत्येकाला ते मान्य् व्हावेत असा आग्रह नाही पण निदान ते वाचून अनेकांच्या बुद्धिवादी मनातील जळमटे नष्ट व्हायला मदत होईल.
207 p.
विज्ञान आणि अंधश्रद्धानिर्मूलन
या पुस्तकाबद्दल दै. तरुण भारत मध्ये - लेखकाने अंधश्रद्धानिर्मूलन समितीच्या काही प्रसिद्ध प्रकरणातील लबाडी (बुवाबाजी) व 'सत्याला सामोरे जाण्यातील तिचा भ्याडपणा' सज्जड पुराव्यानिशी...
From: ekoaham
- 3,125
- 20
- 01 / 06 / 2009
विज्ञान आणि बुद्धिवाद
अतींद्रिय संशोधनातील साधक बाधक बाजू समर्थपणे मांडलेल्या ह्या पुस्तकाबद्दल डॉ. प. वि. वर्तक, पुणे म्हणतात - प्रा. गळतगे यांनी तथाकथित बुद्धिवाद्यांवर व त्यांच्या अकलेवर चांगला प्रकाश पा...
From: ekoaham
- 1,485
- 15
- 01 / 08 / 2009
विज्ञान आणि चमत्कार [ भाग २ रा ]
डोळ्यांना दिसणारे भौतिक जग हेच फक्त खरे जग समजून त्या जगाच्या नियमांच्या शोधालाच 'विज्ञान'म्हणण्याची हल्ली जी प्रथा आहे, ती कशी चुकीची आहे, डोळ्यांना न दिसणारे अतींद्रिय जगही भौतिक जगाइतक...
From: ekoaham
- 1,547
- 25
- 01 / 14 / 2009
विज्ञान आणि चमत्कार [भाग १ ला ]
डोळ्यांना दिसणारे भौतिक जग हेच फक्त खरे जग समजून त्या जगाच्या नियमांच्या शोधालाच 'विज्ञान'म्हणण्याची हल्ली जी प्रथा आहे, ती कशी चुकीची आहे, डोळ्यांना न दिसणारे अतींद्रिय जगही भौतिक जगाइतक...
From: ekoaham
- 2,516
- 28
- 01 / 14 / 2009
Tuesday, 28 February 2012
तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन
तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन
खालील कथन प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ या ग्रंथातील संदर्भ टीप क्रमांक 2 वरून उद्धृत केले आहे.
येथे ‘चमत्कारां’ना ‘तथाकथित’ हे विशेषण लावण्याचे कारण ‘चमत्कार’ नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे आहे. ज्या घटनांना ‘चमत्कार’ समजण्यात येते, त्या वास्तविक निसर्ग-नियमानुसार घडणाऱ्या नैसर्गिक घटना असतात. त्या तशा नसत्या तर त्या घडल्याच नसत्या. त्या कशा घडतात याविषयीचे नियम भौतिकशास्त्रातील गृहितकृत्यांच्या आधारे कळत नसल्यामुळे त्या भौतिकशास्त्राचे नियमोल्लंघन करतात असे भौतिक शास्त्रज्ञ चुकीने – अज्ञानाने- समजतात व त्यांना ‘चमत्कार’ सदरात ढकलतात. वास्तविक त्यांच्या विषयीच्या कार्यकारणभावाचे आपले अज्ञान मान्य करणे व घाईने कोणत्याही निर्णयाला न येणे हा वैज्ञानिक शहाणपणा आहे. प्रस्तुत विभागात ‘चमत्कार’ हा शब्द अवतरण चिन्हात ठेवण्यापाठीमागची लेखकाची हीच भूमिका आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.
दुसरी गोष्ट ‘चमत्कार’ हा शब्द सर्व अतींद्रिय घटनांना उद्देशून या ठिकाणी वापरला आहे. हेही वाचकांनी ध्यानात ठेवावे.
अतींद्रिय घटनांचे संशोधन व अभ्यास करणाऱ्या शास्त्राला प्रारंभी, Psychical Research हे नाव देण्यात आले होते. हल्ली त्याला Parapsychology (परामानस शास्त्र) असे म्हटले जाते. अतींद्रिय घटनांना पुर्वी Psychic Phenomena म्हणत असत. हल्ली त्यांना Extra Sensory Perception(ESP) म्हणजे ‘अतींद्रिय प्रत्यक्ष’ म्हणून संबोधले जाते. घटनांची नाव बदलल्यामुळे त्यांचे स्वरूप बदलत नाही. हा नावातील बदल त्या घटनांकडे पहाण्याचा शास्त्रज्ञांचा दृष्टीकोन अधिक शास्त्रीय बनल्याचे सूचित करतो. याचा अर्थ पूर्वीच्या अतींद्रिय घटनांच्या अभ्यासकांचा दृष्टीकोन अशास्त्रीय किंवा कमी शास्त्रीय होता असा मुळीच नाही.
Psychical research किंवा Psychic Phenomena यामधील अतींद्रिय घटनांचे मूळस्वरूप निर्देशित करणारा ‘Psyche’ हा शब्द असून त्याचे दोन अर्थ आहेत. एक ‘आत्मा’ व दुसरा ‘मन’. या अतींद्रिय घटनांना आत्मा जबाबदार आहे, असे पुर्वीचे संशोधक समजत असत. (म्हणून त्यांचा भर मरणोत्तर आत्म्याच्या अस्तित्वाच्या संशोधनावर प्रामुख्याने असे. (त्यांचे तत्कालीन टीकाकार त्यांना ‘भूत संशोधक’ म्हणून याच कारणासाठी हिणवत असत!)
हल्लीचे संशोधक मानवी मनच याघटनांना कारणीभूत आहे असे समजतात. पण मानवी मनाच्या कर्तृत्वाचे संशोधन ‘शास्त्रीय’ व त्याच्या आत्म्याच्या कर्तृत्वाचे संशोधन ‘अशास्त्रीय’ किंवा (कमी शास्त्रीय) हे तरी कशाच्या आधारे ठरवणार? याविषयीचे शास्त्रीय निकष कुणालाच माहित नाहीत. अतींद्रिय घटनांचे कारकत्व वास्तविक ‘आध्यात्मिक तत्व’ च (Spiritual Principle) आहे. यालाच येथे ‘अतींद्रिय’ हा पर्यायी शब्द वापरला असून ‘अतींद्रिय शास्त्र’ हेच ‘अघ्यात्मिक शास्त्र’ (किंवा ब्रह्मविज्ञान) असल्याचे गृहित धरून ‘मना’च्या वा ‘आत्म्या’च्या कर्तृत्वाचा वादच गैरलागू ठरवण्यात आला आहे. पाश्चात्य शास्त्रज्ञांना योगशास्त्राचा परिचय नसल्यामुळे वस्तुतः हा वाद निर्माण झाला आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
Wednesday, 22 February 2012
हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती - प्रकरण 4
हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती
विज्ञाऩ आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 4
14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै. तरुण भारतमधे बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायब – अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली. अशी एखादी बातमी प्रसिद्ध होताच प्रस्तूत लेखक (प्राचार्य अद्वयानंद गळतगे) ताबडतोब तेथे हजर होतो. त्याप्रमाणे तो तेथे म्हणजे बेडकीहाळ, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव येथे – गेला. नंतर ज्या मुलीच्या अंगावरील कपडे गायब होत होते, त्या मुलीच्या आईच्या सासऱी हे प्रकार मुळात सुरू झाल्याचे कळल्यामुळे तो तेथे ही म्हणजे हेरवाड, तालुका शिरोळ, जि. कोल्हापुर या गावीही गेला. तेथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक इचलकरंजीच्या दै. मँचेस्टरमधे अशीच बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे आलेले आढळले. या संबंधित घराचा भानामती पीडित तरूण (जो इचलकरंजी येथील सुत गिरणीत काम करतो) श्री. मल्लप्पा बसप्पा नेर्ले याने इचलकरंजीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका प्रमुख व प्रसिद्ध कार्यकर्त्यास आपल्या घरातील दीर्घकाळ चालू असलेल्या भानामतीचा बंदोबस्त करावा अशी लेखी विनंती करून देखील...
... त्या वेळचे लेखी विनंती पत्र –
रजिस्टर ए.डी.
नाव - मल्लाप्पा बसाप्पा नेर्ले हेरवाड ( ता. शिरोळ, जि. कोल्हापुर)
प्राश्री. विजयकुमार ईश्वर शिंदे
कोल्हापुर जिल्हा संघटक अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
स.न.वि.वि.
आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे माझ्या घरी येण्याचे कष्ट घेऊन माझा भानामतीचा त्रास नाहीसा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरून मी आपला अतिशय आभारी आहे. आपण व आपल्या समितीच्या लोकांनी अनेकदा हा त्रास येथून पुढे होणार नाही असे घरी येऊन सांगितले आहे, तरी त्रास चालूच आहे. मांत्रिक सुद्धा असेच सांगतात. मग मांत्रिकात व तुमच्यात काय फरक? मांत्रिक हा प्रकार माणसाचा नव्हे असे म्हणतात. आपण हे सारे माणसामुळेच होते असे म्हणता. माणसांमुळे होत असेल तर कोणता माणूस हे करत आहे हे आपण सांगितले पाहिजे. माझ्याकडून आपण मांत्रिकाकडे जाणार नाही असे लेखी वचन लिहून घेतले आहे. माझ्यावर हे बंधन घातल्यामुळे कोणा मांत्रिकाकडे मी जाऊ शकत नाही. मग हे प्रकार बंद होण्यासाठी कोण माणूस हे करीत आहे हे कळावयास नको काय? हे सांगण्याचे आपणावरही बंधन आहे. कारण आपण माझ्याकडून लेखी लिहून घेऊन माझ्यावर बंधन घातले आहे. समजा, हे प्रकार बंद झाले तरी ते कोण करीत होते व का करीत होते हे समजावयास नको काय? इतकेच नव्हे तो ते कसे काय करीत होता हेही कळावयास पाहिजे. तरच तो माणूस ते करत होता असे म्हणता येईल आणि हे आपणांस मला पटवून द्यावे लागेल. ते सुद्धा लेखी सविस्तर पटवून द्यावे लागेल. कारण त्यामुळे भानामतीचा त्रास होणाऱ्या इतर अनेक लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ते सावध होतील. शिवाय माझ्याकडून जसे तुम्ही लेखी घेतले आहे तसे तुम्हालाही मला लेखी लिहून द्यावे लागेल म्हणून मी हे पत्र मुद्दाम लिहिले आहे. तुमचे ही आमच्या घरच्या भानामतीचा उलगडा करणारे सविस्तर पत्र मला आले पाहिजे. किंवा प्रत्यक्ष मला या प्रकारावर प्रकाश टाकणारे लेखी सविस्तर निवेदन माझ्या हातात दिले पाहिजे. असे तुम्हा काही केले नाही तर तुमच्यात आणि मांत्रिकात काही फरक नाही असे समजेन व मी तुम्हाला दिलेल्या वचनातून मुक्त झालो आहे असे समजेन व तुम्हीही असे समजावे.
कळावे.
आपला (म. ब. नेर्ले.)
ता. क. भानामतीच विवेचन केल्यास आमच्या घरचे वातावरण बिघडेल असे आपणास वाटत असल्यास मी तसे काही होणार नाही याची हमी देतो. शेवटी याची जबाबदारी आमची राहील. तुम्हाला याबद्दल जबाबदार धरले जाणार नाही.
आपला (म. ब. नेर्ले.)
यासंदर्भात प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी 19 सप्टेंबर 1993 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना पत्र पाठवून त्यांनी संबंधितांच्या प्रत्यक्ष भेटीतून मिळवलेल्या घटनांचे उल्लेख असलेले 31 बिंदूंचे सविस्तर पत्र रजि. पोस्टाने पाठवले ते न स्वीकारता परत आले.
त्यात 31 मुद्यांनंतर समितीला उद्देशून 12 मुद्दे लिहिले होते. त्यातील 12 क्रमांकामधे ते म्हणतात, ‘भानामती आमच्यासमोर का घडत नाही, ती घडत नसल्यामुळे ती खोटी’ असे आपल्या समितीचे म्हणणे आहे. हा समितीचा प्रश्न, ‘काल संध्याकाळी दवाचे थेंब गवताच्या पानांवर नव्हते, ते सकाळी कुठून आले? (माझ्या समक्ष का आले नाहीत ?)असे आईला विचारणाऱ्या बालकवींच्या ‘बाळ्या’च्या प्रश्नाप्रमाणे बालिश आहे. विज्ञानवृत्तीच्या माणसाला न शोभणारा आहे. ‘तू समोर का घडत नाहीस?’ असे त्या भानामतीला विचार, असे यावर समितीला याच पद्धतीने मल्लाप्पाला उत्तर देता येईल. दुसऱ्या शब्दात ती समोर का घडत नाही हे समितीने शोधून काढले पाहिजे.
निसर्गातील सर्वच घटना समोर घडत नाहीत. अनेक घटना त्या घडून गेल्यानंतरच, त्याची त्याची लक्षणे शरीरात दिसल्यानंतरच कळतात. तो रोग होण्यापुर्वी ते कसे होतात हे कळत नसेल तर ते शोधून काढणे हे जसे वैद्यकशास्त्राचे काम आहे, तसे भानामती ही सुद्धा रोगाप्रमाणे निसर्गातील एक विकृती आहे, असे मानून त्याची कारण परंपरा शोधणे हे विज्ञानवृत्ती बाळगणाऱ्यांचे कर्तव्य आहे. ती बुवाबाजीप्रमाणे कोणत्या तरी स्वार्थी हेतूने केली जात असली पाहिजे हे उघ़ड आहे. तो स्वार्थी हेतू शोधून काढून तो समितीने उघड करून दाखवला पाहिजे. तसे काही न करता कसलाही आधार नसताना मल्लाप्पावर आरोप करणे व पुरावा नसताना विमलच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, म्हणजे प्रतिपक्षाच्या लोकांवर राजकीय हेतूने खोटेनाटे आरोप करणाऱ्या राजकारणी लोकांची खेळी खेळणे होय. म्हणून माझा समितीला शेवटचा प्रश्न आहे की एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होऊ पर्यंत ती निष्पाप आहे असे गृहीत धरण्याची शास्त्रीय व न्याय्य पद्धत धाब्यावर बसवून ती गुन्हेगार असल्याचे अगोदरच गृहीत घरणे, त्यासाठी मारझोड चरित्रहननाचा मार्ग अवलंबणे, आपल्याला हवे ते वदवून घेण्यासाठी खोटेपणा करणे या समितीच्या कार्यपद्धतीवरून समितीचा मूळ हेतू वैज्ञानिक संशोधन करणे हा नसून विशिष्ट राजकीय (नास्तिक आणि धर्मविरोधी) विचार प्रणालीचा राजकीय पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याचा आहे असे का मानू नये?...
वरील पत्र लिहिल्यानंतर घडलेल्या काही घटना –
· मल्लाप्पाच्या वडिलांचा हॉस्पिटलात अचानक मृत्यू. वडिलांची बळी घेऊन भानामती गेली असा मल्लाप्पाचा समज झाला. पण दोन महिन्यानंतर हा समज चुकीचा ठरवणाऱ्या अनेक घटना सुरू झाल्या.
अशी ही हेरवाडची एकाच कुटूंबातील सातआठ वर्षे त्याना याना त्या स्वरुपात सतत भंडावणारी भानामती! बातमीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हे आव्हान आहे, असे म्हटल्यामुळे जिची समितीच्या लोकांना इच्छेविरुद्ध दखल घ्यावी लागली व जिच्यापुढे त्यांना नाक घासावे लागले. अशी ही भानामती! असे म्हणावयाचे कारण 15 सप्टेंबर 1993 रोजी, अंनिसचे दोन लोक मल्लाप्पाच्या घरी आले व ती बंद होत नसल्याचे कळल्यामुळे ही ‘भानामती आम्हाला कळत नाही. येथून पुढे आम्ही येणार नाही’ असे म्हणाले आणि यांनी हा शब्द अक्षरशः पाळला!
हेरवाडच्या भानामतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीची केलेली फजिती पाहून कुणी असा ग्रह करून घेईल की येथून पुढे तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती भानमती हे अतिप्राकृतिक सत्य आहे, हे मान्य करील. पण सत्य आणि अंनिस हे एकत्र कधीच नांदत नाहीत. थोड्याच दिवसात सांगलीत लोकांची एक बैठक झाली ती मधे या लोकांनी चक्क जाहीर केले की हेरवाडची भानामती खोटी असून तो प्रकार घरची मुख्य व्यक्ती विमल हीच करते! याला पुरावा काय? विचारू नका! आधार काय? विचारू नका! समितीच्याच लोकांनी मल्लाप्पाच्या घरी येऊन लोटांगण घातले होते. या वस्तुस्थितीचे काय? विचारू नका! असले प्रश्न उपस्थित करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे! अंधश्रद्धा नाही ती सत्यशोधक समितीच्या लोकांकडेच!
हे संपुर्ण प्रकरण इथे वाचा.
Saturday, 18 February 2012
आता ऑर्कूटवरून ही ब्लॉगशी संपर्क साधता येईल.
मित्रांनो,
आता ऑर्कूटवरून ही ब्लॉगशी संपर्क साधता येईल.
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=121361504&tid=5710412904230850783
आता ऑर्कूटवरून ही ब्लॉगशी संपर्क साधता येईल.
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=121361504&tid=5710412904230850783
Friday, 17 February 2012
कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’ विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 8
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 8
कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’
1980 साली गुलबर्गा आणि बिदर जिल्ह्यातील अनेक गावात भानामतीचे प्रकार वरचेवर घडू लागल्यामुळे व या प्रकरणांचा वृत्तपत्रात फार गवगवा झाल्यामुळे त्याचे पडसाद कर्नाटक विधान परिषदेतही उमटले. आणि काही सदस्यांनी लक्षवेधी सुचना मांडून सरकारला या प्रकारांची अधिक चौकशी करण्याचा आग्रह केला गेला. तदनुसार विधान परिषदेचे सदस्य व बंगलोर युनिवर्सिटीचे भूतपुर्व व्हाईस चान्सलर डॉ. एच. नरसिंहय्या (जे भानामती, चमत्कार, ज्योतिष इ. खोटे मानणारे बुद्धिवादी म्हणून ख्यातनाम आहेत.) त्यांच्या नेतृत्वाखाली सात विधानपरिषद सदस्यांची या भनामतीच्या शास्त्रीय शोधासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने ‘नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरोसायन्यसेस’ (NIMHANS)या बेंगलोर येथील विज्ञान संस्थेतील सहा लेक्चरर्स, व पोस्ट गॅज्युएट व रेसिडेंट्स लोकांचे ही सहाय्य घेतले. गुलबर्गा, बीदर जिल्ह्यातील संबंधित बारा गावांना या सर्व मंडळींनी प्रत्यक्ष भेट दिली व दोनशेहून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या. परस्तूर या खेड्यातील सदतीस व्यक्तींच्या शऱीर व मानसशास्त्रीय तपासण्या केल्या आणि 1981 सालच्या प्रारंभी हे इतिवृत्त तयार करून प्रसिद्ध केले.
समितीचा निष्कर्ष
या भानामतीचा अभ्यास करून समितीने जो निष्कर्ष काढला आहे, तो समितीच्याच शब्दात पहा –
“या भानामतीचे बळी बनलेल्या बऱ्याच लोकांची सखोल तपासणी केल्यावर व भानामतीच्य़ा उपलब्ध घटनांची काळजीपुर्वक सखोल छाननी केल्यावर या शोध समितीने असा एकमुखी व ठाम निर्णय काढला आहे, की ही तथाकथित भानामती कोणत्याही अज्ञात शक्तीने घडून येत नाही.” ( हा निश्कर्ष समितीने अधोरेखित केला आहे.)
(त्या प्रकरणातील काही मथळे)
समितीची शास्त्रीय जबाबदारी
- अशा रितीने ही भानामती कुठल्याही अज्ञात शक्तिने घडून येत नसेल तर कोणत्या ज्ञात शक्तिने घडून येत होती, हे सांगण्याची शास्त्रीय जबाबदारी समितीवर येऊन पडते. ती जबाबदारी समितीने व्यवस्थित पार पाडली आहे काय असा प्रश्न आहे. ... पण खेदची गोट अशी, की या समितीने या घटनांची केवळ सारवासारव केली आहे ... आणि आवश्यक शास्त्रीय तपासणीसारख्या गोष्टींचा नावालाही उल्लेख नाही .... त्याचे सार समितीच्याच शब्दात असे – “Some of the prominent causes (of Banamati) have been fear, ignorance, superstition, personal and family problems, religious feuds and village politics.” (“या भानामतींच्या कारणांपैकी प्रमुख कारणे म्हणजे भीती, अज्ञान, अंधश्रद्धा, वैयक्तिक आणि कौटुंबिय समस्या, गरिबी, धार्मिक वैमनस्य आणि गावचे राजकारण”)
- याला म्हणतात भानामतीचा शास्त्रीय शोध!
- मनोव्याधींचा व भानामतीचा निश्चित संबंध काय?
- समिताची भानामतीचा शास्त्रीय कारणमिमांसा
- कपडे कसे जळाले?
- “भानामतीला बळी पडलेली गावे एक जात भ्रमिष्ट!” – इति समिती
- सुशिक्षित लोक सुद्धा भानामतीवर विश्वास का ठेवतात?
- शेवटी समितीचा फुगा फुटला !
- भानामतीचे प्रकार बंद करण्यासाठी शेवटी समितीने भानामती किंवा चेटूक करणाऱ्यांवर बंदी घालावी अशी सरकारला शिफारस केली आहे. पण नग्न साधूंच्या समाजात कपड्यांवर व शिंप्यांवर बंदी घालावी असे म्हणण्यासारखे हे हास्यास्पद नाही काय? जे मुळातच खोटे आहे, अस्तित्वातच नाही त्यावर बंदी कसली घालता?
- भानामतीवर कायद्याने बंदी घालायची शिफारस करून भानामती खोटी नाही हेच समितीने अप्रत्यक्षपणे मान्य केलेले नाही काय?
- फुटलेल्या फुग्याच्या शेवटी चिंध्या –
- ब्रिटिश पार्लमेंटने 1735 साली Witchcraft Act(चेटूक कायदा) पास केला होता. तो चेटूक खरोखरच करण्यात येत असल्यामुळेच, म्हणजे त्यात तथ्यांश असल्यामुळेच पास केला होता.
Subscribe to:
Posts (Atom)