Monday, 16 January 2012

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 2. --- अनुराधाबाईंच्या विभूती- चमत्कारमुळे अंधश्रद्धा - निर्मूलनवादाची इतिश्री


ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे कर्नाटकातील निपाणी जवळच्या भोजगावातील फार्म हाऊसमधे


Sir with two side tophies presented in Varanasi for his contributi​on in Vedanta Philosophy and Center one for his contributi​on of book "विज्ञान आणि चमत्कार"

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 2. ---

अनुराधाबाईंच्या विभूती- चमत्कारमुळे अंधश्रद्धा - निर्मूलनवादाची इतिश्री

अलिकडे अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधी इतके ऐकावयास व वाचावयास मिळते कि ते पाहून मानवी समाजाच्या गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात आत्ताच एकदम अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत की काय ? असा दाट संशय येऊ लागतो.  ते काहीही असो,... अंनिस स्थापन केल्यामुळे आता अंधश्रद्धा लवकर संपुष्टात येणार,  त्यांचे निर्मूलन होणार असे समजावयास हरकत नाही...
अनुराधा बाईंचा चंदूर गावातील चमत्कार
सोलापुर जिल्हातील मोहोळ तालुक्यात मसले चौधरी नावाचे एक लहान खेडे आहे. या खेड्यातील एका पडदानशीन मराठा कुटुंबातील अनुराधा नावाच्या स्त्रीच्या अंगात सोमनाथ या देवाचा संचार होत असल्याची व या संचार अवस्थेत तिच्या रिक्त हातातून विभूती, गुलाल, रुद्राक्ष, बेल वस्तू निघत असल्याची घटना सुमारे पाच वर्षांपासून घडत असल्याचे सांगण्यात येते. (हा लेख 1988 साली लिहिला आहे.) या विषयी सविस्तर वृत्त 'श्री' साप्ताहिकाने आपल्या फेब्रुवारी 28 ते 6 मार्च 87च्या अंकात प्रथम प्रसिद्ध केले. पण 'श्री' नेहमी खोट्या बातम्या देते अशी स्वतःची  सोईस्कर समजूत करून घेतलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण एक दिवस असा उजाडला की त्यांना या चमत्काराच्या घटनेची दखल घ्यावीच लागली. हा दिवस होता - 25 मार्च 1988 आणि ठिकाण होते इचलकरंजीहून 3-4 किमी अंतरावराल चंदूर हे खेडे.


दै. तरुण भारतने 1 एप्रिलच्या (कोल्हापुर) अंकातील बातमीचा महत्वाचा भाग असा...
..."(अनुराधाबाईंची)गाडी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात अडवली आणि त्यांना विविध प्रश्न विचारले. सर्व प्रश्नांना त्यांनी शांतपणे उत्तरे दिली. आम्हाला येथे वाटेतच चमत्कार करून दाखवा, असा आग्रह त्यांनी धरला. तेंव्हा अनुराधाबाईंनी आपले दोन्ही हात उंचावून मोकळे असल्याचे सर्वांना सांगितले. नंतर त्यांनी विभूती आणि शिवलिंग काढून दाखवले. विशेष म्हणजे समितीच्या कार्यकर्त्यांच्या हातातच शिवलिंग व विभूत पडली! आम्हाला तुमचे ढोंग आहे हे आत्ता सिद्ध करता आलेले नाही, पण अशा चमत्कारावर आमचा विश्वास नाही असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले म्हणू लागले. तेंव्हा उपस्थित लोकांनी त्यांची हुर्योबाजी करून त्यांना पिटाळून लावले. "...
या प्रकरणातील काही मथळे
  • अंधश्रद्धेने जखडलेले अंधश्रद्धानिर्मूलनवादी
  • श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक
  • 'जगात चमत्कारहोत नाहीत'! इति अं.श्र.नि.समिती
  • श्रद्धा निर्मूलन समिती
  • आणि अंधश्रद्धा निर्मूलन
  • आव्हाने - प्रतिआव्हाने
  • समितीने शेवटी आव्हान स्वीकारले नाही
  • चमत्कारांसबंधी प्रश्न
  • रिक्त हातातून  काढण्याचा नियंत्रित प्रयोग  
  • निष्कर्ष
  • परिशिष्ट 1 -अबकडई 1995 च्या दिवाळी अंकातील विपर्यस्त व खोटा मजकूर व त्याला दिलेले प्रत्युत्तर
  • परिशिष्ट 2 व 3 - या विषयावर डॉ. दाभोलकर व कै. प्रा. व. वि. अकोलकर यांच्याशी झालेला पत्रव्यवहार

No comments:

Post a Comment